क्राईमताज्या बातम्या

जिकडेतिकडे आगीचे लोट,10 ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी…


सुरजागड येथील लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रक ने दुचाकी ने जाणाऱ्या दांपत्याला ट्रकची धडक बसल्याने पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर -ते आल्लापली महामार्गवर असलेल्या शांतीग्राम गावानजीक दामपूर फाट्याजवळ मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घडली.

मृत महिलेचे नाव बिजोली जयदार रा.कांचनपूर असे आहे. अपघातात ठार महिला ही पती सुभाष जयदार सोबत दुचाकीवर शांतीग्राम वरून कांचंनपुर ला जात होती. आलापल्ली च्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत (Truck Accident) रोडवर दोघेही खाली पडले त्यात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला .धडक देताच आरोपी ट्रक चालक ट्रक सोडून पसार झाला.

अपघाताची माहिती मिळताच संतप्त होऊन जमावाने ट्रकचालकांवर दगडफेक केल्याने मोठी अफरातफरी माजली असून जमावाने 8ते 10 ट्रक ला आग लावून आगीच्या भक्ष्यस्थानी पाडले. जिकडेतिकडे आगीचे लोट दिसून येत होते .खराब रस्ते व मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक यामुळे त्रस्त नागरिकांनी अपघाताचे निमित्ताने ट्रकांणा लक्ष्य केले.या घटनेची माहिती होताच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अहेरी वरून अतिरिक्त पोलीस कुमक घटनास्थळी पाठविली असली तरी अंधार होत असल्याने आणि लोकांचा आक्रोश असल्याने पोलीस सावध पवित्रा घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *