लिंबागणेश येथे “आमचं गाव आमचा विकास “राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा संपन्न -डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
लिंबागणेश येथे “आमचं गाव आमचा विकास “राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा संपन्न :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
महाराष्ट्र शासन,ग्रामविकास विभाग,जिल्हापरिषद बीड व पंचायत समिती बीड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान कार्यक्रम अंतर्गत “आमचं गाव आमचा विकास “उपक्रमा”अंतर्गत ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसंसाधन गट सदस्य यांचे दि.२८ सप्टेंबर २०२२ बुधवार रोजी लिंबागणेश ग्रामपंचायत येथे बीड तालुका पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी टेकाळे श्रीराम यांनी मुख्यमार्गदर्शक म्हणून सरपंच स्वप्निल गलधर यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एकदिवसीय गणस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली यावेळी लिंबागणेश ग्रामविकास आधिकारी आर.टी.राठोड,मुख्याध्यापक,
अंगणवाडी सेविका, मदतनीस ,स्वयंसहाय्यता बचतगट, सरपंच,ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
२ ऑक्टोबर रोजीच्या ग्रामसभेत अनुपस्थित आधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी:-डाॅ.गणेश ढवळे
____
आमचं गाव आमचा विकास एकदिवसीय गणस्तरीय कार्यशाळेत लोकप्रतिनिधी तसेच आधिकारी-कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती त्यांना गावच्या विकासाविषयी गाभीर्य नसल्याचे द्योतक आहे. या कार्यशाळेत बहुसंख्य गावातील
तलाठी,आरोग्यसेवक,कृषी सहाय्यक,पशुसंवर्धन वि.आ.,ग्रामरोजगार सेवक,ग्रामपंचायत संगणक परिचालक,यांची अनुपस्थिती दिसून आली एकंदरीतच यांना ग्रामविकास उपक्रमांविषयी अनास्था दिसून येत असून ही चिंताजनक बाब असून दि.०२ ऑक्टोबर च्या ग्रामसभेत सर्व आधिकारी;कर्मचारी यांची उपस्थिती बंधनकारक असुन गैरहजर राहणा-या संबधितांची तक्रार वरीष्ठांकडे करण्यात यावी असे आवाहन केले.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२