ताज्या बातम्या

राजस्थानमध्ये राजकीय भूकंप,82 आमदार राजीनाम्याच्या तयारीत


राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप येताना दिसून येत आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे समर्थक असलेले सर्व आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

गहलोत समर्थक आमदारांना सचिन पायलट यांच्याकडे राज्याची सत्ता सोपवून मुख्यमंत्री बनवण्यास विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस हायकमांडवर दबाव टाकण्यासाठी गहलोत गटाच्या सर्व आमदारांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गहलोत गटाचे सर्व आमदार हे सभापती सीपी जोशी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता आहे.
82 आमदार राजीनाम्याच्या तयारीत

काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गहलोत यांचं नाव आलं आणि त्यासोबतच राजस्थानमधील मुख्यमंत्री पदाचा सुद्धा मुद्दा उपस्थित झाला आहे. पुढील वर्षात राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे गहलोत यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची आणि पद कोणाकडे सोपवावे हा प्रश्न निर्माण झाला. सुरुवातीला असे वाटत होते की, सचिन पायलट हे सत्तेचे दावेदार आहेत. मात्र, हे सर्वांना मान्य नसल्याचं दिसत आहे. कारण, गहलोत समर्थक आमदारांनी सचिन पायलट यांच्या नावाला विरोध केला आहे.
राजस्थान सरकारमध्ये मंत्री आणि गहलोत यांचे जवळचे सहकारी प्रताप सिंह खाचरियावास यांनी सांगितले की, सर्व आमदार नाराज आहेत आणि राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. यासाठी आम्ही अध्यक्षांकडे जात आहोत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपल्यासोबत चर्चा न करता निर्णय कसा घेऊ शकतात.

संध्याकाळी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी आमदारांच्या गटाची एक बैठक पार पडली होती. यासाठी दिल्लीहून पर्यवेक्षक म्हणून वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रभारी अजय माकन हे जयपूरमध्ये दाखल झाले होते. विधीमंडळ पक्षाच्या गटाची बैठक पार पडली या बैठकीत प्रस्ताव पारित करण्याचं म्हटलं होतं की, विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत हायकमांड नव्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय घेईल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *