अमरावती : ‘आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे पुष्कळ प्रमाणात समोर येत आहेत. लव्ह जिहाद संदर्भात येत्या अधिवेशनात याबाबत खासगी विधेयक मांडून कायदा करण्याची मागणी भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केली.ते माध्यमांशी बोलत होते.
खासदार अनिल बोंडे म्हणाले, “आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे. आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांच्या पालकांना आधी सूचना दिली जावी. लव जिहाद थांबवण्यासाठी धर्मीय विवाह कायदा करणे आवश्यक आहे, कारण मुलींना 14 व्या वर्षापासून प्रलोभने दिले जाते, आंतरधर्मीय विवाहाच वय २५ वर्ष करण्यात यावं, सब रजिस्टर मॅरेज ब्युरो मध्येच विवाह झाला पाहिजे व मुस्लिम कायदा लागू होऊ नये यासाठी अधिवेशनात राज्यसभा सभागृहात खाजगी विधेयक मांडू “राज्यात ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच ते संसदेच्या आगामी अधिवेशनात या विषयावर विधेयक आणण्याची तयारी करत आहेत. लव्ह जिहाद सुनियोजित कटाखाली सुरू आहे. अमरावतीच्या उमेश कोल्हे खून प्रकरणानंतर पकडलेल्या आरोपीचा लव्ह जिहाद प्रकरणाशीही संबंध असल्याचे समोर आले आहे. हे आता सिद्ध झाले आहे. मेळघाटातील आदिवासी मुलींना अडकवून पळवून लावले जाते. मुलीने विरोध केला तर तिला जीवही गमवावा लागतो, असे बोंडे यांनी यापूर्वीही सांगितले आहे.
अशीच एक घटना काही दिवसापूर्वी चिखलदरा तालुक्यातही उघडकीस आली आहे. काही मुले कॉलेजच्या बाहेर उभी राहून मुलींवर नजर ठेवतात. त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून तरुणीशी संपर्क साधला जातो. हे सर्व पूर्ण नियोजन करून चालते. पुढील संसदीय अधिवेशनात विधेयक मांडण्याची तयारी सुरू केल्याचे अनिल बोंडे यांनी सांगितले. आंतरधर्मीय विवाह आणि लव्ह जिहाद रोखण्यासाठी सध्याच्या कायद्यात तरतूद असली तरी ती पुरेशी नाही, असे ते म्हणाले