विनायक मेटे अनंतात विलीन.. बीडमध्ये सरकारी इतमामात अंत्यसंस्कार
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. आज त्यांच्या पार्थिवावर बीडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच, दरेकर, बावनकुळे अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मराठा आरक्षणासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी विनायक मेटे हे रात्रीच रवाना झाले. बीडमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. सर्व कार्यक्रम रद्द करून विनायक मेटे हे मुंबईला रवाना झाले होते. यावेळी पहाटे पाच वाजता त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातानंतर तब्बल एक तास त्यांना मदत मिळाली नसल्याचं त्यांच्या गाडीच्या चालकाने सांगितलं. त्यांनी अखेर मुंबईतील एमजीएम रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.