तालिबानचा रहिमुल्लाह हक्कानी (Rahimullah Haqqani) काबूलमध्ये (Kabul) आत्मघातकी हल्ल्यात ठार (Death) झाला आहे. हा आत्मघाती हल्ला झाला तेव्हा हक्कानी काबूलमधील मदरशात हदीस वाचत होता
मात्र, तालिबानने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
रहिमुल्लाह हक्कानी याला ठार (Death) मारण्याचा कट रचण्यात आला होता. याअंतर्गत हा आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यात रहिमुल्लाह हक्कानीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, रहिमुल्लाचा मृत्यू अंतर्गत वैमनस्यातून झाला की नाही हे स्पष्ट झालेले नाही.
रहिमुल्लाह हक्कानीवर यापूर्वीही हल्ला झाला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर हा हल्ला ऑक्टोबर २०२० मध्ये झाला होता. हक्कानीवर तिसऱ्यांदा हल्ला झाला. २०१३ मध्ये पेशावरच्या रिंग रोडवर त्याच्या ताफ्यावर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला होता. परंतु, तो सुरक्षितपणे पळून जाण्यात यशस्वी झाला होता.
या हल्ल्यांसाठी हक्कानीने ख्वारिज घटकांवर बॉम्बस्फोट घडवल्याचा आरोप केला होता. शेख रहीमुल्लाह हक्कानी हा पाकिस्तान (Pakistan) सीमेजवळील नांगरहार प्रांतातील पचिर अव आगम जिल्ह्यातील रहिवासी होता. हक्कानी हादीसमध्ये पारंगत होता. त्याने स्वाबी आणि अकोरा खट्टक येथील देवबंदी मदरशांमधून शिक्षण पूर्ण केले.