शेफच्या निष्काळजीपणामुळेच त्याचा जीव गेल्याचे बोलले जात आहे. मात्र शेफला देखील कल्पना नव्हती की २० मिनिटे तुकडे केल्यानंतर सापामध्ये जीव राहील. विशेष म्हणजे तज्ञांच्या मते, कोब्राचे डोके कापल्यानंतर देखील त्याच्यामध्ये २० मिनिटे जीव राहतो. तसेच ही एक खूप दुर्मिळ घटना असल्याचे त्यांनी म्हटले. एकूणच कोब्रा सापाला कापल्यानंतर देखील त्याच्यात जीव असतो आणि त्याने केलेल्या हल्ल्यामुळे ३० मिनिटांतच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता असते. कारण कोब्राचे विष खूप धोकादायक असते.
चीन : सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही अनोख्या गोष्टी व्हायरल होत असतात.व्हायरल होणाऱ्या काही गोष्टी तर अशा असतात ज्यांच्यावर विश्वास देखील ठेवणे कठीण असते. सध्या अशीच एक घटना चर्चेचा विषय बनली आहे, ज्यामध्ये एका कापलेल्या कोब्राने शेफवर हल्ला केला आणि २० मिनिटातच शेफचा मृत्यू झाला. म्हणजेच कोब्राचे डोकं धडापासून वेगळे केल्यानंतर देखील तो जिवंत होता. ही धक्कादायक घटना चीनमध्ये घडली आहे. दक्षिणी चीनमधील एक रेस्टॉरंट सापांच्या सूपासाठी खूप प्रसिद्ध आहे. मात्र हा सूप आता शेफच्या चांगलाच आंगलट आला असून दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. लक्षणीय बाब म्हणजे शेफने सापाचे तुकडे करून २० मिनिटे भांड्यात ठेवले होते.
दरम्यान, चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये काम करणारा शेफ पेंग फॅन इंडोचायनीज स्पिटिंग कोब्रा स्नेकच्या मांसापासून ताजे सूप बनवत होता. सापाच्या मांसापासून सूप बनवण्यासाठी त्याने सापाचे २० मिनिटे तुकडे केले. मात्र एवढा वेळ त्याचे तुकडे केल्यानंतर देखील त्या सापामध्ये जीव होता आणि त्याने शेफच्या डोक्यावर हल्ला केला. हल्ला झाल्याचे कळताच डॉक्टर घटनास्थळी आले मात्र त्यापूर्वीच शेफचा जीव गेला होता.