ताज्या बातम्या

सावधान ! फोनमध्ये बघण्याच्या सवयीमुळे होऊ शकतात ‘हे’ आजार


आजच्या काळात फोन हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकालाच स्मार्टफोनने अक्षरशः वेड लावलं आहे.
जवळ फोन असला की माणूस त्यातच मग्न असतो. अनेकांचा जास्तीत जास्त वेळ फोनवर जातो. फोनवर सोशल मीडिया सर्फिंग करण्यात तरुण खूप वेळ घालवतात. अनेकांना तर फोनची इतकी सवय असते, की बराच वेळ फोन वाजला नाही, तरी अस्वस्थता निर्माण होते.

काही जण तर त्याच्या इतके आहारी गेलेले असतात की त्यांना वारंवार त्यात डोकावण्याची सवय जडलेली असते. स्मार्टफोनमध्ये वारंवार पाहण्याची सवय तुम्हालाही जडली असेल, तर सावध होण्याची गरज आहे. फोनमध्ये वारंवार पाहण्याच्या सवयीमुळे माणसाचं आयुष्य कमी होऊ शकतं, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. डॉक्टरांच्या मते, वारंवार स्मार्टफोनकडे पाहण्याच्या सवयीमुळे तणाव निर्माण होतो.

सर्वांत जास्त टेन्शन फोनमध्ये येणाऱ्या मेसेजेसमुळे (Message) येतं. सरासरी दर 36 सेकंदांना स्मार्टफोनवर कोणत्या ना कोणत्या प्रकारचं नोटिफिकेशन मिळते. याच नोटिफिकेशन्समुळे तणाव वाढतो. या संदर्भातलं वृत्त ‘कॅच न्यूज’ने दिलं आहे.

धक्कादायक! आईच्या चहाच्या तलफेमुळे बाळाची भयंकर अवस्था; एक वर्षाच्या चिमुकल्याची करावी लागली सर्जरी कॉर्टिसोल हॉर्मोन तणाव आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तणावाखाली असते तेव्हा शरीरात कॉर्टिसॉल हॉर्मोन स्रवतं, असं दिसून आलंय. या हॉर्मोनमुळे माणसाचं हृदय वेगाने पंप होऊ लागते.

त्यामुळे शरीरातली शुगर लेव्हल वाढते. फोनमध्ये बघण्याच्या सवयीमुळे होऊ शकतात ‘हे’ आजार एका रिपोर्टनुसार, तणावामुळे व्यक्तीचं केवळ आयुष्यच कमी होत नाही, तर मधुमेह, हृदयविकाराचा झटका आणि डिप्रेशन यांसारखे अनेक आजार होऊ शकतात. फोनचा विचार करताच आपली टेन्शन लेव्हल झपाट्याने वाढते. फोनवर आलेल्या मेसेजमधून राहिलेलं काम, वाईट मेसेज वाचून आपल्या शरीरात कॉर्टिसोल हॉर्मोनची पातळी वाढते आणि फोनच्या व्यसनामुळे, सवयीमुळे आपलं टेन्शन हळूहळू वाढत जातं.

फोनची सवय कमी करण्यासाठी उपाय तुमच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करून मेंदूवर नियंत्रण मिळवा. त्यामुळे तुमची फोन पाहण्याची इच्छा कमी होईल. तसंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणं कमी करा. आपण शेअर केलेल्या पोस्टवर लोकांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया बघण्यासाठी वारंवार फोन तपासला जातो. त्यात कमी लाइक्स, कमी किंवा उलटसुलट कमेंट्स असतील तर त्या वाचूनसुद्धा अनेकांचं मन व्यथित होतं, मूड जातो. मग या गोष्टींचा परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे आवश्यक असेल तेव्हाच स्मार्टफोन वापरणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *