फिल्म इंडस्ट्री हि अशी इंडस्ट्री आहे जिथे काही लोक हे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचतात तर काही लोकांना निराश होऊन परत जावे लागते. अनेकांना मोठी प्रसिद्धी मिळते. पण याच पडद्यामध्ये अनेक कलाकारांसोबत धक्कादायक प्रकार देखील घडले आहेत.
मुंबई : बॉलिवूड असो किंवा इतर कोणतीही इंडस्ट्री कास्टिंग काऊचचा मुद्दा कायमच उचलला जातो. अनेक अभिनेत्री आपल्यासोबत झालेल्या धक्कादायक प्रकारांचा खुलासा करताना दिसत असतात.
असाच खुलासा एका साऊथच्या अभिनेत्रीने केला आहे. चारमिला या साऊथच्या अभिनेत्रीने आपल्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणाचा खुलासा केला आहे. चारमिला ही साऊथमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने Indiaglitz ला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्यासोबत घडलेला हा धक्कादायक प्रसंग शेअर केला.
ती कास्टिंग काऊचची शिकार होता होता वाचली. या अभिनेत्रीने नुकतीच एक मल्याळम चित्रपट केला ज्याचं शूटिंग कालिकत इथे झालं. या अभिनेत्रीचं वय 48 असल्याने तिला आईची भूमिका देण्यात आली. तर तिला बहिणीसारखं समजणाऱ्या सिनेमाच्या 23 वर्षीय निर्मात्याने केलेली मागणी ऐकून या अभिनेत्रीला धक्का बसला.
अभिनेत्रींच्या मते, ती या भूमिकेमुळे बरीच आनंदी आणि उत्सुक होती. काही दिवस चांगले गेल्यावर तिच्या असिस्टंटला बोलवून घेण्यात आलं आणि तिला सेक्शुअल फेवर विचारण्यात आला. यासाठी तिला तब्ब्ल 50 हजार रुपयांची ऑफर देण्यात आली. यानंतर तर हद्दच पार झाली कारण तिला बोलवून निर्मात्याने दोघांपैकी एकासोबत तरी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी निवडावं असं सांगितलं.
तिला या गोष्टीने फार धक्का बसला आणि तिला हे पटलं नाही. तिने निर्मात्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या मुलापेक्षा वयाने थोडेसेच मोठे आहात त्यामुळे मला आईसारखंच समजा. हे सांगून त्यामुळे त्यांची ऑफर नाकारत अभिनेत्री चेन्नईला रवाना झाली.तिने अनेक सिंगल मदर असणाऱ्या अभिनेत्रींना अशा माणसांपासून जपून राहायचा सल्ला दिला आहे.