एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यामागे उद्धव ठाकरेच असण्याची शक्यता – शहाजी बापू पाटील
काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते हाटील, एकदम ओकेच, या डायलॉगने फेमस झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदारांनी मोठा दावा केला आहे.
शिंदेंनी जेव्हा सांगितले तेव्हा सूरतला मीच पहिला जाऊन पोहोचलो होतो. मविआ सरकार नको अशी सर्वांची भावना होती, सर्वच पक्षात खदखद होती, असे शहाजी बापू पाटील म्हणाले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील याची आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती. मी गोव्यातील हॉटेलमध्ये झोपलो होतो. तेव्हा माझा पीए पळत पळत आला आणि त्याने बापू जागे व्हा, शिंदे मुख्यमंत्री झालेत, असे सांगितले. मी तसाच नाईट पँटवर धावत धावत खाली गेलो, तेव्हा विश्वास बसला, असा प्रसंग पाटलांनी सांगितला.
तोवर आम्हाला शिंदे उप मुख्यमंत्री होतील, एवढेच वाटत होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यामागे उद्धव ठाकरेच असण्याची शक्यता आहे. ठाकरेंनी तेव्हा एक वाक्य म्हटलेले, शिंदे मुख्यमंत्री होऊन दाखवा. कदाचित त्याच शब्दांवरून शिंदेंना मुख्यमंत्री बनविण्यात आले असेल असे मला वाटते. ठाकरेंनी आव्हान दिलेले. भाजपाने पुढचा विचार करून, गरम घास थंड करून हा निर्णय घेतल्याचे शहाजी बापू पाटील म्हणाले.