भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, बीड, लातूर, जालना, परभणी आणि महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबई आणि कोकणातील बऱ्याच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता मराठवाड्यात सुद्धा पुढील आठवडाभर जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर सोबतच वादळी वाऱ्याची शक्यता सुद्धा हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, 5 जुलै रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्हा,जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळ वारा व विजेच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 6 आणि 7 जुलैदरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.