महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीतील घडामोडींवा वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकार आपल्या पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल की ते बरखास्त होईल, याबाबतचा उलगडा पुढच्या 12 तासांमध्ये होण्याची शक्यता आहे.
कारण शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने दिल्लीत सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर सकाळी साडेदहा वाजता सुनावणी सुरु होणार आहे