ताज्या बातम्याधार्मिकबीड जिल्हाबीड शहर

विठुरायाच्या दर्शनाला जाणार्‍या भाविकांसाठी बीड विभागातून 180 बसेस


बीड आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनाला जाणार्‍या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागातून 180 बसेस सोडण्यात येणार

बीड : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनाला जाणार्‍या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागातून 180 बसेस सोडण्यात येणार

भाविकांच्या मागणीनुसार व आवश्यकतेप्रमाणे बसेस उपलब्ध करण्यासाठी प्रवाशांनी संबंधित आगार प्रमुखाशी संपर्क करावा, असे आवाहन विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी केले आहे. दरम्यान, दोन वर्षानंतर प्रथमच आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये यात्रा भरणार आहे. सन 2019 मध्ये 130 बसेसचे नियोजन करण्यात आले होते.

दोन वर्षांपूर्वी 61 हजार वारकर्‍यांचा प्रवास दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये बीड विभागातील बसेसच्या माध्यमातून 61 हजार 776 प्रवाशांची वाहतूक करण्यात आलेली होती. आषाढी वारीला जाण्याकरिता आता दोन वर्षांनंतर वारकर्‍यांना संधी मिळणार असल्याने मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन 180 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक
अजयकुमार मोरे यांनी केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *