वट पौर्णिमेच्या सनाला या दिवशी महिला आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाला प्रार्थना करतात.विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना करतात. या वृक्षावर त्रिदेवांचा वास असल्याचे सांगितले जाते. या झाडावर ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव वास करतात.
या झाडावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत माता लक्ष्मीचा वास असल्याचे सांगण्यात आले आहे. वटवृक्षाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि सर्व आर्थिक समस्या दूर होतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी केलेली उपासना मोठ्या संयमाने आणि निश्चयाने पूर्ण होते.
वट पौर्णिमा व्रत तिथी आणि पूजा मुहूर्त
1.पौर्णिमा 13 जून रोजी दुपारी 1:42 ते 14 जून रोजी सकाळी 9:40 पर्यंत असेल.
2. यामध्ये 14 जून रोजी सकाळी 9:40 वाजून 40 मिनिटांनी शुभ योग सुरू होऊन 15 जूनच्या पहाटे 5:28 पर्यंत राहील.
3. 14 तारखेला पूजेचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी खूप चांगला योग देखील होत आहे.
4. प्राप्ती योगासोबतच शुभ योगही यावेळी आहे.जे चांगले मानले जातात.
वट पौर्णिमा व्रत पूजा पद्धत (Vat Purnima Vrat 2022 Puja Vidhi)
वटपौर्णिमेचे व्रत पाळणाऱ्या स्त्रीया सकाळी आंघोळ करून वटवृक्षाजवळ सौभाग्याचं लेणं घेऊन जातात. वटवृक्षाभोवती कच्चा कापूस गुंडाळून, जल अर्पण करून, हळद, कुंकू वाहतात. वटवृक्षाला चंदन लावून त्याची विधिवत पूजा करतातआणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते.यावेळी महिला सावित्री आणि सत्यवानाच्या कथाही वाचतात. यामुळे त्यांना नशीबवान आणि मुलगी होण्याचे वरदान मिळते.
वटवृक्षाचे महत्त्व
वडाचे झाड सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. कारण ते इतर झाडांपेक्षा जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करते आणि पर्यावरणासाठी खूप फायदेशीर आहे.वैज्ञानिक महत्त्वामुळे या झाडाची पूजाही केली जाते.