क्राईमताज्या बातम्याबीड जिल्हा

बीड जनावरांच्या गोठ्यात बाजेवर केला जात होता अवैध गर्भपात


अवैध गर्भपात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा गर्भपात शेतातील जनावरांच्या गोठ्यात बाजेवर केला जात होता. विशेष म्हणजे सौर ऊर्जेच्या उजेडात हे पाप करण्यात आले आहे, गर्भपात केल्यानंतर बाजूच्या दरीत बाजरीच्या सरमाडाने अर्भक जाळले असून बाज स्वच्छ धुऊन आंब्याच्या झाडाखाली ठेवल्याचे उघड झाले

बीड : बीडच्या अवैध गर्भपात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा गर्भपात शेतातील जनावरांच्या गोठ्यात बाजेवर केला जात होता. विशेष म्हणजे सौर ऊर्जेच्या उजेडात हे पाप करण्यात आले आहे. जेथे गर्भपात केला त्या गोठ्यापासून बाजूलाच 100 फुटांच्या अंतरावर असलेल्या एका दरीत हे अर्भक सरमाडाने जाळण्यात आले आहे. आरोपी सासऱ्याला घेवून पोलिसांनी बीड तालुक्यातील बक्करवाडी गावात जावून स्पॉट पंचनामा करून जाळलेल्या ठिकाणची आजूबाजूची माती, राख, ज्या बाजावर गर्भपात झाला त्या ठिकाणी आढळलेले रक्ताचे डाग फॉरेन्सिक तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

बीड येथील 30 वर्षीय शीतल गणेश गाडे या महिलेचा 5 जून रोजी मृत्यू झाला होता. शीतल यांना अगोदरच तीन मुली आहेत. त्या चौथ्यांदा गर्भवती होत्या. गर्भलिंग निदान केल्यानंतर गर्भपात करताना त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पती गणेश सुंदरराव गाडे, सासरा सुंदरराव बाबूराव गाडे (दोघे रा. बकरवाडी, ता. बीड), भाऊ नारायण अशोक निंबाळकर (रा. शृंगारवाडी, ता. माजलगाव), महिला एजंट अंगणवाडी सेविका मनीषा शिवाजी सानप (रा.अर्धमसला, ता. गेवराई), प्रयोगशाळा तंत्रज्ञ वासुदेव नवनाथ गायके (रा. आदर्शनगर, बीड), परिचारिका सीमा सुरेश डोंगरे यांच्याविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. यातील नर्स सीमा हिने पाली येथील तलावात बुधवारी दुपारी आत्महत्या केली. इतर पाचही लोक पोलिसांच्या ताब्यात आहेत. मयत शितलच्या पती सासरा आणि भावाला पाच दिवसाची पोलीस कोठडीत आहेत. या प्रकारात आणखी बरेच खुलासे समोर येणे बाकीच आहे या सर्व प्रकरणाकडे संबंध राज्याचे लक्ष लागले आहे…

पोलीसांच्या स्पॉट पंचनाम्यात धक्कादायक सत्य…

-जनावराच्या गोठ्यात सौर ऊर्जेच्या प्रकाशात बाजावर केला अमानुषपणे गर्भपात..

– गर्भपात केल्यानंतर बाजूच्या दरीत बाजरीच्या सरमाडाने जाळले अर्भक.. बाज स्वच्छ धुऊन आंब्याच्या झाडाखाली ठेवली…

अर्भक नष्ट केले त्या ठिकाणी हाडे, मेडिसिनचे रॅपर, इंजेक्शन जळालेल्या अवस्थेत सापडले

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *