महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सुरू
झाला नवयुवकांच्या प्रवेशाचा झंजावात….
बीड शहरातील नवतरूणांचा मनसेत जाहीर प्रवेश
बीड : गुढी पाडवा अर्थात हिंदूनववर्षापासून महाराष्ट्रातील राजकारणाला हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे यांनी कलाटणी दिली आहे. राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने अखंड हिंदूस्थानातील जनता व नवतरूण प्रेरीत झाला आहे. त्यांच्या विचारांना माणून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात असंख्य तरूण, तरूणी व नागरीकांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत स्वयंस्फुर्तीने प्रवेश होऊ लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून बीड जिल्ह्यातही असंख्य युवक व युवती व नागरीक मनसेत प्रवेश करत आहेत. बुधवार दि.1 जून 2022 रोजी बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे असंख्य तरूणांनी मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव बिडवे यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा सचिव अशोक सुरवसे यांच्या उपस्थितीत तर शहराध्यक्ष करण लोंढे यांच्या संघटनात्मक बांधणीतून असंख्य नवयुवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मनसेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मराठी युवक व युवतींच्या असंख्य प्रश्नावर तसेच हिंदू समाजावरील होत असलेल्या विविध अन्यायावर आवाज उठवून महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील समस्त हिंदू बांधवांना एकत्रित करण्याचे कार्य केले आहे. महाराष्ट्रातील मराठी युवकांना आपले हित कशात आहे हे दाखवून दिले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होवून करण तुसांबड यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह सागर सौदा, शुभम सौदा, राहुल लाहोट, आदित्य तूसांबड, अनिकेत सोळुंके, सिद्धार्थ मसदार, कपिल लाहोट, उमेश शिंदे, गणेश दहिवाळ, कृष्णा, आदित्य, रोहीत, कार्तिक, किरण, योगेश, दिपक, अतिश, तसेच अर्जुन बहोत यांनी देखील आपल्या समर्थकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. दिवसेंदिवस बीडमध्ये सर्व जाती व धर्मातील नवयुवकांचा हिंदूजननायक राज ठाकरे यांच्याकडे कल वाढतच जात आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमात राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव बिडवे, शहराध्यक्ष करण लोंढे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष अंकुर गायकवाड यांनी मनसेत जाहीर प्रवेश केलेल्या तरूणांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ व पक्षाचा झेंडा देवून गौरव केला. तसेच पक्षाचे ध्येय व धोरण समाजापर्यंत घेवून जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल व पक्षाची शिस्त समजावून सांगीतली. कार्यक्रमास मनसेचे रामेश्वर साळुंके, महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई जगदाळे, आशाताई घुले, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष अंकुर गायकवाड, अनिल जमदाडे, कार्तिक जव्हेरी, तुषार दोडके, आकाश टाकळकर, बालाजी काटे, सुनील टाकळकर, अतुल कुलकर्णी आदींसह मनसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.