महागाई,बेरोजगारी,शेतकरी व कामगार या बिकट समस्यांना वाचा फोडण्यासाठी निबंध स्पर्धाच्या माध्यमातुन भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे अनोखे आंदोलन
पिंपरी चिंचवड : केंद्र सरकारने लागू केलेले जाचक कृषी कायदे ,कामगारांना बाबतचेही जाचक कायदे ,वाढते पेट्रोलियम पदार्थांच्या किमती, गॅसच्या सतत वाढत असलेल्या किमती यामुळे सर्वसामान्य माणसाचे बिघडलेले गणित याला आवाज उठविणे गरजेचे असताना वाढता जातीयवाद, हनुमान चालिसा,भोंगे, राम मंदिर यासाठी आंदोलने सुरू आहेत परंतु सतत रोज वाढत असलेली महागाई याबाबत कोणीच बोलायला तयार नाही .त्यामुळे भारतीय राष्ट्रवादी पक्षाचेवतीने एक वेगळे आंदोलन करण्याचे ठरवले आहे.
आज सगळे पक्ष हे महागाईबाबत मात्र आंदोलन मोर्चे काढण्यास तयार नाहीत. सर्वसामान्यांबाबत कोणी बोलायला तयार नाही म्हणून शासनापर्यंत सामान्य जनतेच्या भावना कळाव्यात यासाठी ही महानिबंध स्पर्धा आयोजित केली आहे.
या महानिबंध स्पर्धेत खालील विषय आहेत – १) महागाई २) बेरोजगारी ३) शेतकरी ४) कामगार
भारतात वाढत असलेली महागाई, बेरोजगारी,शेतकरी व कामगारांचे विरोधातील कायदे हे सर्व कुठे तरी थांबले पाहिजे.सर्व पक्ष आंदोलन करत आहेत, मोर्चे काढत आहेत पण सध्याचे राजकारण हे जातीवाद पद्धतीने चालेल दिसत
आहे .महागाई व उसाच्या प्रश्नांवर कोणीच बोलत नाही .यासाठी हे मुद्दे घेऊन जनतेच्या मनातील प्रश्नांना सरकारपर्यंत पोचवण्यासाठी ही निबंध स्पर्धा आयोजित केली आहे हा नवीन उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर असेल.स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र दिले जातील.
खालील दिलेल्या ईमेल वर आपल्या मनात महागाई व बाकीच्या मुद्यावर असलेलं मत
व्यक्त करण्यासाठी हे नवीन व्यासपीठ आहे. यासाठी आपण कोणतेही आंदोलन घेऊन मोर्चे न काढता केंद्र सरकार /राज्य सरकारला नागरिकांच्या भावना लक्षात आणून देणे म्हणून हा प्रयत्न आहे. मोजक्या शब्दांत कोणाच्याही भावनांना न दुखावता ,कोणत्याही जातीवाचक शब्दांचा वापर न करता आपल्या भावना व्यक्त कराव्यात.
लेख पाठवण्यासाठी पत्ता – ajeetsancheti17@gmail.com
mhbryp@gmail.com
अधिक माहितीसाठी :- 9172207776 , 7030402160, 7741843979
हा उपक्रम राबविण्यासाठी मा प्रदेशाध्यक्ष मनीष दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे महानिबंध आंदोलन महाराष्ट्रभर होणार आहे अशी माहिती भारतीय राष्ट्रवादी पार्टी चे महासचिव मा अजित प्रकाश संचेती यांनी दिली आहे.