अनिता भोसले यांना यशवंतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले
जय मल्हार प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या राजे यशवंत रत्न
पुरस्कार तसेच यशवंत रत्न आदर्श शिक्षक पुरस्कार आज देण्यात आले. विविध सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक शैक्षणिक उल्लेखनीय कार्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात असे जय मल्हार प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. राजेंद्र गाडेकर सर यांनी सांगितले . यावर्षीचा यशवंत रत्न पुरस्कार हा उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी अनिता नितीन भोसले यांना मा. जयदत्तजी क्षीरसागर यांच्या हस्ते देण्यात आला. अनिता भोसले यांचे सामाजिक कार्य डोळ्यासमोर ठेवून नेहमीच होतकरू गरीब महिलांसाठी साड्यांचे वाटप, अन्नदान, व कोरोना काळातही विविध ठिकाणी अन्नदान करण्यात त्यांचे योगदान होते. तसेच समाजामध्ये होणाऱ्या महिलांच्या आत्याच्यावर परखडपणे लिखाण करून नेहमीच महिलांच्या न्याय हक्काविषयी रोखठोक निर्भीड पत्रकारिता क्षेत्रात नावलौकिक असणाऱ्या व दैनिक सूर्योदय या वर्तमानपत्राच्या वार्ताहर ही आहेत. अनिता भोसले यांचे सामाजिक कार्य डोळ्यासमोर ठेवून त्यांना या वर्षीचा राजे यशवंत रत्न पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डॉ. शिवाजी राऊत, मा. विष्णू दादा देवकते, योगेश भैय्या क्षीरसागर, प्रा सर्जेराव काळे मा अनिल दादा जगताप कल्याण आबूज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रा. डॉ. सत्यनारायण ढवळे, प्रा. नितीनजी भोसले, नितीन गोपन प्रा .सादर सर यांनी विशेष परिश्रम घेतले.