सकाळचे पत्रकार अनिरूद्ध धर्माधिकारी यांना धमकावणा-यावर गुन्हे दाखल करा – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बीड : १५ व्या वित्त आयोगाची माहीती गटविकास आधिकारी आष्टी सुधाकर मुंडे यांना मागितली म्हणून दैनिक सकाळ बीड चे आष्टी प्रतिनिधी अनिरूद्ध धर्माधिकारी यांना धमकी दिल्याबद्दल बद्री जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन याचे मुख्य सुत्रधार गटविकास आधिकारी पंचायत समिती आष्टी सुधाकर मुंढे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी पोलीस अधिक्षक बीड यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सविस्तर माहीती
बीड जिल्ह्य़ातील आष्टी तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत रोहयो तसेच १५ व्या वित्त आयोगातील निधी कागदोपत्रीच बोगस कामे दाखवुन नियमबाह्य रित्या खर्च केल्याचे आढळून आले असून “आष्टीतील रोहयो कक्षाला महिनाभरापासून टाळे ” तसेच जलसिंचन विहीरी, शेततलाव लाभार्थींची आर्थिक लुट ” या मथळ्याखाली दैनिक सकाळ बीड औरंगाबाद विभागीय दैनिकात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आष्टीतील रोहयो कक्षाचे टाळे महिनाभराने उघडण्यात आले. याचा राग मनात धरूनच जेव्हा अनिरूद्ध अरविंद धर्माधिकारी यांनी गटविकास आधिकारी पंचायत समिती आष्टी सुधाकर मुंढे यांना १५ व्या वित्त आयोगातुन खर्चाच्या निधीची मागितली. त्यानंतर सुधाकर मुंढे यांनी याविषयी बद्री जगताप यांना माहिती सांगितल्यानंतरच बद्री जगताप यांनी अनिरूद्ध धर्माधिकारी यांना १५ व्या वित्त आयोगाची माहिती का मागतोस म्हणून धमकी दिली त्या संदर्भात पत्रकार अनिरूद्ध अरविंद धर्माधिकारी यांनी पोलीस स्टेशन आष्टी येथे रितसर तक्रार दाखल केली असून संबधित प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,
पत्रकारांना धमकावण्याचे फ्याड सुरू असून पोलीस प्रशासनाची भुमिका बोटचेपेपणाची पत्रकार कायद्यांतर्गत कारवाईस टाळाटाळ
____
बीड जिल्ह्य़ातील पत्रकारांना धमक्या देणे,त्यांच्यावर दबाव आणण्याचा मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असून पोलीस प्रशासनातील आधिकारी यांच्या बोटचेपीपणाच्या भुमिकेमुळे हल्लेखोरांचे मनोधैर्य वाढत आहे, पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत नसल्यामुळेच धमकावणे,हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे.पत्रकारांचे जीव धोक्यात असून भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज