औरंगाबाद मध्ये ह्ल्लाबोल, उत्तर प्रदेशमध्ये लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही ?
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील जाहीर सभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या सभेत राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केले.या सभेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करुन मोठी गर्दी केल्यामुळे ही सभा लक्षवेधी ठरली
औरंगाबादेतील सांस्कृतिक मैदानात एंट्री करताच एकच जल्लोष झाला. मोठ्या संख्येने लोक सभा ऐकायला उपस्थित होते. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… म्हणत राज यांनी सभेची सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातालीच त्यांनी, जो इतिहास विसरतो त्याच्या पायाखालचा भुगोल सरकतो, असे म्हणत शिवाजी महाराजांच्या काळातील, एकनाथ महाराजांच्या काळातील ऐतिहासिक दाखले दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही शिवाजी महाराजांबद्दल काय म्हटले होते, ते सांगितलं.
मशिदींवरील भोंग्याचा विषय राज यांनी उचलून धरला होता त्यावरुन, गेल्या 10 दिवसांपासून राज ठाकरेंवर टिका करणाऱ्यांना काय प्रत्युत्तर मिळणार, राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगाबाद यांच्या इतिहासाची उजळणी औरंगाबादच्या सभेत केली. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब 27 वर्षे स्वत:लाच छळल्यासारखं वाटून घेत होता. शिवाजी हा एक विचार होता, हे औरंगजेबाला कळलं होतं, असेही राज ठाकरे म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच एक वाक्य खूप अप्रतिम आहे. आपल्या लोकांच्या अंगात देवी येते, देव येतो, भुतं येतात. बाबासाहेब म्हणाले होते की, ज्यादिवशी शिवाजी नावाचं भूत अंगात येईल, तेव्हा जग पादाक्रांत करू…, असं सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांचं बाबासाहेबांनी सांगितलं होतं, असा इतिहास राज ठाकरेंनी सांगितला. राज यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर हल्लाबोल केला. शरद पवार हे नास्तिक आहेत हे मी म्हटलं, पण ते तर त्यांच्याच कन्येनं लोकसभेत सांगितलं होतं, असा पलटवार राज यांनी राष्ट्रवादीवर केला