क्राईमताज्या बातम्या

भिंतीत लपवून ठेवलेल्या10 कोटी रुपयांच्या नोटा,19 किलो चांदीच्या विटा


राज्य जीएसटी विभागाने जीएसटी चोरीच्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. अशाच एका धडक कारवाईत जीएसटी चोरी उघड झाली आहे. झवेरी बाजारातील चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल 2019-20 मध्ये 22 कोटी 83 लाख रुपयांवरून 2020-21 मध्ये 665 कोटी रुपये आणि 2022 या वर्षामध्ये 1 हजार 764 कोटी रुपयंवर गेली. आर्थिक प्रगतीचा हा चढता आलेख पाहून राज्य जीएसटी विभागाला संशय आला. ही वाढलेली उलाढाल पाहून जीएसटी विभागाने तपास सुरू केला असता या कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणीच नसल्याचे आढळले. या संशयावरून जीएसटी विभागाने कंपनीच्या कार्यालयांची तपासणी केली, पण जीएसटी अधिकाऱ्यांच्या हाताला काहीच लागले नाही. पण तरीही तपास सुरू ठेवला तेव्हा कंपनीच्या एका 35 चौरस मीटर जागेतील एका भिंतीमध्ये लपवून ठेवलेली 9 कोटी 79 लाख रुपयांच्या करकरीत नोटा आणि 13 लाख रुपयांच्या चांदीच्या विटा सापडल्या तेव्हा जीएसटी विभागाचे अधिकारीही आश्चर्यचकित झाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *