लिंबागणेश ग्रामपंचायतीत राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त शाश्वत विकासासाठी ग्रामसभेत संकल्प – डाॅ.गणेश ढवळे
आज दि.२४ एप्रिल रविवार रोजी सकाळी ११ वाजता लिंबागणेश ग्रामपंचायतीत राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्त शाश्वत विकासाच्या दृष्टिकोणातुन ९ संकल्प ग्रामसभेमध्ये मांडुन पुर्ण करण्याच्या दृष्टिने संकल्प करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच स्वप्निल गलधर, प्रमुख उपस्थीती गटशिक्षणाधिकारी टेकाळे एस.एस.,मुख्याध्यापक,जिल्हापरिषद प्राथमिक शाळा लिंबागणेश मोराळे एस.एल., सुरज ढास, समाधान ढास, प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबागणेश श्रीमती शिंदे एस. आर.(एएनएम), आशा स्वयंसेविका वैद्य एस.पी., अंगणवाडी सेविका तागड जी.एन.,यमुना ढेरे, तसेच ग्रां.प.सदस्य श्रीहरी निर्मळ, बाबासाहेब गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी जीवन मुळे, सुखदेव वाणी, कोतवाल बाळुकाका थोरात, गणपत आगवान, मोहन कोटुळे, निर्मळ जितेंद्र, सुरेश निर्मळ,पप्पु आवसरे, बबन आबदार, संदिप आवसरे, औदुंबर नाईकवाडे, कैलास गायकवाड, आदि उपस्थित होते.
सविस्तर
राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्ताने १३६७ गावांमध्ये जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन टप्पा २ अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळजोडणी उपलब्ध करून देणे, मंजूर झालेल्या योजनांची आराखड्याप्रमाणे लोकवर्गणी जमा करणे यांच्यासह ९ संकल्प पुर्ण करण्यासाठी विशेष ग्रामसभा व बैठकीचे आयोजन करण्याचे आदेश जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी आधिकारी यांनी दिले आहेत.
२४ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा होत आहे. गावातील सामान्य ग्रामस्थांना शासनाच्या सर्व योजनांची माहिती देऊन त्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य शिक्षण व जीवनमान उंचावण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ९ संकल्पासाठी ग्रामपंचायत मध्ये चर्चा करून मंजुरी आवश्यक आहे. राष्ट्रीय पंचायतराज दिनानिमित्ताने केंद्र व राज्य शासनाने विविध उपक्रम व आराखड्यातुन करावयाच्या विविध कामांच्या तरतुदीमध्ये नव्याने सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार या आर्थिक वर्षापासुन शाश्वत विकासाच्या ध्येयाची पंचायतराज यंत्रणेमार्फत प्रभावी अंमलबजावणी
ग्रामसभामध्ये ग्रामपंचायत स्थापनेचा दिवस निश्चित करून केली जाणार आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत ८१ लक्ष रूपयांची योजना लवकरच कार्यान्वित:- सरपंच, स्वप्निल गलधर
लिंबागणेश येथे पुर्वीची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असतानाच जल जीवन मिशन अंतर्गत वस्तीवरील ग्रामस्थांसाठी ८१ लक्ष रूपये मंजूर करण्यात आले असून घरोघरी नळयोजना पोहचवण्यात येईल तसेच स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत उर्वरीत कामे करण्यात येतील, स्वच्छतेच्या बाबतीत ईतर बहुतांश कामे पुर्ण झालेली आहेत.
ग्रामस्थांनी हक्काबरोबरचं मंजूर योजनांची आराखड्याप्रमाणे लोकवर्गणी जमा करावी कर्तव्ये पार पाडावीत :-डाॅ.गणेश ढवळे
ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडुन मुलभुत सुविधासह शासनाच्या पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक विविध योजनेची पुर्तता हक्काने करून घेतानाच कर्तव्ये पार पाडायला हवीत ,पारदर्शकपणे ग्रामपंचायत कारभार पारदर्शकतेने व्हावा ही अपेक्षा बाळगतानाच मंजूर योजनांची आराखड्यांप्रमाणे लोकवर्गणी जमा करण्यासाठी पुढाकार घ्यावा.