समाजाचे मेळावे घेऊन स्वतःची पोळी भाजणाऱ्या पुढाऱ्यांपासून वेळीच सावध व्हा – मनोज ठाणगे
२७ एप्रील रोजी चंदन उटी सोहळा असुन माळी समाजाचे आराध्य दैवत श्री संत सावता महाराज यांच्या अरण या गावी ३० तारखेला राष्ट्रवादीचा मेळावा होतोय .माळी समाजाला उल्लू बनवण्याच काम काही संघटना करताहेत चंदन उटी सोहळ्याच महत्व कमी करण्याच काम राजकीय पुढारी करत असतील तर माळी समाज यांचे कटकारस्थान खपवुन घेनार नाही,हे आयोजकांनी लक्षात घ्यावे.
बीड : समाजाच्या नावाने संघटना काढणे,समाजाला विशिष्ट पक्षाच्या दावणीला बांधणे आणि स्वतःच्या पदरात एखादे महामंडळ किंवा आमदारकी पडते का ? यासाठी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेऊन लाचारपणे सरकार मधील पुढाऱ्यांच्या मागेमागे फिरणे,सध्या हि बाब समाजातील संघटनेच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहे.
बांधवांनो यांना फक्त समाजाचा वापर करून घ्यायचा आहे,आणि एकदा का स्वतःच्या पदरात पडले की हेच लोक समाजाला वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आत्ताच समाजाने सावध व्हावे असे आवाहन भाजपा युवा नेते मनोज ठाणगे यांनी केले आहे.
उद्या हेच समाजातील संघटनेचे हरवलेले पुढारी तुमच्या भेटीला येणार आहेत,समाजातील महापुरुषांच्या स्मारकाच्या व समाजातील संतांच्या देवस्थानांबाबत विकासाच्या पोकळ गोष्टी करण्यासाठी,समाजाला एकजूट करूयात अशा खोट्या वल्गना करण्यासाठी,तरुण मित्रांनो या अशा स्वाभिमान विकणाऱ्या नेत्यांपासून वेळीच सावध व्हा.
स्वतःच लक्ष व्यवसायाकडे,नोकरीकडे द्या,उद्या तुमच्यावर एखादा वाईट प्रसंग आला तर कुणीच संघटनेचे नेते मदतीला येत नाही,याचा अनुभव समाजातील अनेक तरुण कार्यकर्त्यांना आलेला आहे.
उद्या ते तुम्हाला मेळाव्याचे आमंत्रण घेऊन येतील,त्यांना फक्त एकच प्रश्न विचारा आजपर्यंत एव्हढ्या वर्षात समाजासाठी काय केले ? संतांच्या देवस्थानांच्या विकासाचे काय झाले ? समाजातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी काय केले ? समाजातील आरक्षण मुद्यासाठी जेंव्हा समाजातील जेष्ठ नेते झगडत होते तेंव्हा तुम्ही संघटनेचे नेते म्हणून काय योगदान दिले ?
यांच्याकडे तुम्हाला कोणतेच उत्तर मिळणार नाही,त्यामुळे या लोकांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला जाऊन स्वतःचा स्वाभिमान विकू नका, हा मेळावा म्हणजे समाजातील कायमस्वरूपी झगडणाऱ्या,आणि प्रसंगी समाजावर कुठलाही वाईट प्रसंग आला तर त्यासाठी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आवाज उठवनाऱ्या नेत्याचे खच्चीकरण करण्यासाठी आहे,आपला खरा नेता कोण आहे ते निवडा, उगाच लुंग्यासुंग्याच्या मागे आपला वेळ घालवू नका,आपण सर्वजण स्वाभिमानी आहोत हि बाब खरी आहे,परंतु तुमचा स्वाभिमान परस्पर विकून,समाजाला कुणा एका पक्षाच्या दावणीला बांधून स्वतःच्या पारड्यात काही पडते का ? यासाठी या संघटनेच्या नेत्याचा खटाटोप आहे.