क्राईमताज्या बातम्याबीड जिल्हाबीड शहर

बीड आरटीओ कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरण,कार्यालयातील ५ एजंटावर फसवणुकीचा गुन्हा दाखल


अखेर बीड आरटीओ कार्यालयातील ५ एजंटावर फसवणुकीचा गुन्हा दाखल ; सत्याग्रह आंदोलनाला यश – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

बीड : बीड आरटीओ कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरण झाले असून खाजगी एजंटाच्या माध्यमातून बनावट कागदपत्रे तयार करून बनावट आरसी, परवाने प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली ७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले होते त्यात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष शिरूर कासार अशोक कातखडे, सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे,मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, शेख मुबीन, माजी सैनिक प्रकाश वाघमारे सहभागी झाले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी बीड यांनी उपप्रादेशिक परिवहन आधिकारी बीड यांना मुद्यांबाबत चौकशी करून कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगानेच दि.२२ एप्रिल रोजी उपप्रादेशिक परिवहन आधिकारी स्वप्निल माने यांच्या फिर्यादीवरून आधिका-यांच्या बनावट स्वाक्ष-या करून खोटे कागदपत्रे तयार करणे,खोट्या स्वाक्ष-या करून वाहन हस्तांतरण करणे, वाहनावरील बोजा उतरवणे आदि गैरव्यवहार उघडकीस आल्याने कार्यालयीन आधिका-यांची तसेच शासनाची फसवणूक केल्याबद्दल बीड ग्रामिण पोलीस ठाण्यात गुफरान बेग, सय्यद इरफान, दिगंबर गायकवाड, बाबा काजी, शहाजान खान (सर्व रा.बीड )यांच्यावर कलम ४२०,४६७,४६८,४७१,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे करत आहेत.

परराज्यातील वाहनांना परवाने, कोट्यावधींचा घोटाळा, सीबीआई चौकशी करा;छोटे मासे गळाला, अजुन मोठे मासे जाळ्याच्या बाहेरच:-डाॅ.गणेश ढवळे
____
सध्या गुन्हे दाखल झालेले छोटे मासे असुन मुख्यतः लाॅकडाऊन कालावधीत औरंगाबाद येथून कामकाज सुरू असून बीड आरटीओ कार्यालयातुन हरियाणा, गुजरात, राजस्थान येथील वाहनचालकांना बीड आरटीओ कार्यालयातुन बोगस परवाने देण्यात आले असुन प्रति परवाना २५-३० हजार रूपये दर ठरलेला असून एकादिवसात परवाना दिला जात असे तसेच नाॅनयुझ प्रमाणपत्र वितरणात शासनाचा कोट्यावधी रूपयांचा महसुल बुडवून आधिकारी-कर्मचारी मालामाल झाले असून संबधित प्रकरणात सीबीआई मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *