केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशात लवकरच समान नागरी कायदा लागू होऊ शकतो, असे संकेत दिलेत.
भोपाळमध्ये भाजप नेत्यांच्या बैठकीत त्यांनी सांगितलं की, सीएए, राम मंदिर , कलम ३७० आणि ट्रिपल तलाक यांसारख्या मुद्द्यांवर निर्णय झालाय. आता समान नागरी कायद्याची वेळ आलीय. याआधी त्यांनी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना विचारलं की, देशात सर्वकाही ठीक झालं काय? यानंतर त्यांनी समान नागरी कायद्याची चर्चा केली.
दरम्यान, पक्ष कार्यालयात कोअर कमिटी आणि प्रमुख नेत्यांसोबत अनौपचारिक बैठकीत शहांनी सांगितलं की, उत्तराखंडमध्ये हे पथदर्शी कार्यक्रमांतर्गत लागू केलं जात आहे. मसुदा तयार केला जात आहे. शिल्लक राहिलेलं काम योग्य पद्धतीनं पूर्ण केलं जाईल. मात्र, तुम्ही लोकांनी पक्षाला नुकसान होईल, असं कोणतंही काम करु नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
तत्पूर्वी शहांनी देशात सर्व काही ठीक झालं? असा प्रश्न राज्यातील वरिष्ठ नेत्यांना विचारला. यानंतर, त्यांनी कॉमन सिव्हिल कोड मुद्द्यावर चर्चा केली. एवढंच नाही, तर पुढील निवडणुकीपूर्वी राहुल गांधी काँग्रेसचे (Rahul Gandhi) अध्यक्ष होतील. पण, काळजी करण्याचं काही कारण नाही, काँग्रेसची आणखी दयनीय अवस्था होणार आहे. कसलंही आव्हान नाही, असंही शाह म्हणाले. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते. यानंतर, शाह BSF च्या विमानानं दिल्लीला परतले.