ताज्या बातम्याबीड जिल्हा

शासकीय आधिका-यांकडुन ३५३ कलमाचा दुरूपयोग तात्काळ बंद करा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


पत्रकार डाॅक्टर, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरील हल्लेखोरावर कठोर कारवाई करत शासकीय आधिका-यांकडुन ३५३ कलमाचा दुरूपयोग तात्काळ बंद करा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
____
बीड जिल्ह्य़ातील पत्रकार, वैद्यकीय सुविधा देणारे डाॅक्टर तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांवर हल्ल्याचे वाढते प्रमाण ही अत्यंत चिंताजनक बाब असून त्यातच दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे शासकीय आधिकारी-कर्मचाऱ्यांकडुन जिल्हाप्रशासनातील भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवणारे माहीती आधिकार अथवा सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रशासनाला जाब विचारताच त्यांच्यावर कायद्याचा दुरूपयोग करत ३५३ कलम अथवा पोलीस प्रशासनातील आधिका-यांप्रती अप्रीती आदि कलमांतर्गत गुन्हे दाखल करून दडपशाहीसाठी कायद्याचा गैरवापर होताना दिसत असून यांच्या निषेधार्थ तसेच पत्रकार, डाॅक्टर, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरील हल्लेखोरावर संबधित पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत तसेच वैद्यकीय व्यवसायिकांवर हल्ला प्रकरणात संबधित कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर , हिमा संघटना

जिल्हाध्यक्ष डाॅ.लक्ष्मण यांच्या जाधव नेतृत्वाखाली  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात येऊन खा. प्रितमताई मुंढे आणि प्रभारी पोलीस अधिक्षक बीड सुनिल लांजेवार यांना निवेदन देण्यात आले

यावेळी आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष शिरूर कासार अशोक कातखडे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन, शेख मुबीन, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे ,शहराध्यक्ष सय्यद सादेक तसेच हिमा संघटना जिल्हाध्यक्ष बीड डाॅ.लक्ष्मण जाधव
,उपाध्यक्ष डाॅ.अमरेंद्र विद्यागर, डाॅ.वासुदेव नेहरकर, डाॅ.अभय वनवे ,डाॅ.गिरीश किन्हीकर, डाॅ.सुबोध महाजन, डाॅ.धोंगडे सुरेश, डाॅ.होनराव उमेश, डाॅ.अजित जाधव,डाॅ.वाघमोडे, डाॅ.संभाजी पवार, डाॅ.सुनिता पवार, डाॅ.गुंजेकर, डाॅ.स्वामी, डाॅ.वाघ, डाॅ.नितिन सोनवणे,डाॅ.रोहीत झोडगे, डाॅ.सर्वोत्तम शिंदे, डाॅ.जितिन वंजारे आदि सहभागी होते.

गढी येथील डाॅ. पवार दांमपत्यावर हल्ला प्रकरणात व कठोर कारवाई करा :- डाॅ.लक्ष्मण जाधव (हिमा संघटना जिल्हाध्यक्ष बीड)
____
गेवराई तालुक्यातील गढी येथील डाॅ.संभाजी पवार व डाॅ.सुनिता पवार
खाजगी वैद्यकीय व्यावसायिक दांमपत्यावर क्षुल्लक कारणावरून दवाखान्यात घुसुन हल्ला करणारांवर वैद्यकीय व्यवसायिकांवरील हल्याअंतर्गत सन २०१० च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११ महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय सेवा व्यक्तिबाबत घडणा-या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि वैद्यकीय सेवा, संस्थाच्या मालमत्तेची हानी किंवा नुकसान होण्यास प्रतिबंध करण्यासाठी संबंधित कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी.

पोलिस प्रशासनातील आधिका-यांकडुन पदाचा गैरवापर :- माजी सैनिक अशोक येडे (आप जिल्हाध्यक्ष बीड)
______
बीड जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नोंदणी कार्यालयात दिवसा गोळीबार व सीसीटीव्हीची हार्डडिस्क गायब प्रकरणात सोशल मिडीयावर पोलीस अधिक्षक विरोधात टीपन्नी केल्यामुळे आम आदमी पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांच्यावर दाखल गुन्हा करण्यात आला होता
तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष शिरूर कासार अशोक कातखडे यांनी वाळुमाफियांविरोधात तक्रारी केल्यानंतर त्यांच्यावर वाळुमाफियांनी हल्ला प्रकरणात पोलिसांकडून वाळुमाफियांची पाठराखण करत कठोर कारवाई करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ करण्यात आली.

३५३ कलमाचा शासकीय आधिकारी-कर्मचा-याकडुन गैरवापर :डाॅ.गणेश ढवळे
__
माहिती आधिकार कार्यकर्ते शार्दुल अॅड. देशपांडे यांनी मुख्य कार्यकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर विभागीय चौकशी लागणे यामुळेच शार्दुल देशपांडे यांच्याविरूद्ध ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर शेख बक्शु यांनी आरटीओ कार्यालयातील अनोगोंदी कारभार तसेच भ्रष्टाचार प्रकरणात तक्रार करून दोषींवर गुन्हे दाखल केल्यानंतर त्यांच्यावर सुडबुद्धीने शासकीय कामकाजात अडथळा म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून आधिकारी कर्मचाऱ्यांकडुन सुडबुद्धीने या आधिकाराचा गैरवापर होत असून तो थांबायला हवा.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *