बीड मराठा आरक्षणाबाबत अपशब्द वापरल्याने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे मराठा समाजाला अत्याचारी समाज, असे संबोधित करणे. मराठा आरक्षण संदर्भात वेळोवेळी त्यांनी मराठा समाजाचा अपमान केला त्याचबरोबर चर्चेत राहण्यासाठी सदावर्ते यांनी माध्यमांसमोर जाऊन मराठा समाजाच्या भावना वारंवार दुखावल्या आहेत, अशी तक्रार स्वप्निल गलधर यांनी बीड पोलिसात दिली
कोल्हापुरात आणि पुण्यातही गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली. साताऱ्यानंतर आता बीड पोलीसही सदावर्तेंना ताब्यात घेण्याची जास्त शक्यता आहे
बीड : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सदावर्ते यांच्यावर आता बीडमध्ये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाबाबत अपशब्द वापरल्याने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
भाजप तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर यांच्या तक्रारी वरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत सदावर्तेंवर दाखल होणारा हा तिसरा गुन्हा आहे. सुरूवातीला शरद पवारांच्या घराबाहेर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे.
या आंदोलकांना भडकावल्याचा आणि सतत प्रक्षोभक भाषणे केल्याचा, कट रचल्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका सदावर्ते यांच्यावर मुंबई पोलिसांकडून ठेवण्यात आला. या गुन्ह्यात गुणरत्न सदावर्तेंना चार दिवस पोलीस कोठडीत मुक्कामी काढावे लागले, त्यानंतर त्यांचा ताबा हा सातारा पोलिसांना देण्यात आला.