पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी गुजरातमधील मोरबी येथे भगवान हनुमानाच्या 108 फूट मूर्तीचे अनावरण केले.पंतप्रधान मोदींनी देशवासियांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. पवनपुत्राचे आशीर्वाद सर्वांवर असोत, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, हनुमानजी यांचे चार धाम प्रकल्पांतर्गत देशभरात चार दिशांना बसवण्यात येणाऱ्या चार मूर्तींपैकी ही दुसरी मूर्ती आहे. मोरबी येथील बापू केशवानंद यांच्या आश्रमात याची स्थापना करण्यात आली आहे. देशाच्या पश्चिमेला स्थापित केलेला हा पुतळा आहे. या मालिकेतील पहिला पुतळा 2010 मध्ये शिमल्यात बसवण्यात आला होता. मोरबीमध्ये 2018 मध्ये भव्य मूर्तीच्या उभारणीला सुरुवात झाली होती. त्याची किंमत 10 कोटी रुपये आहे. पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला हजेरी लावली. त्याचवेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि अन्य नेते कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.