पुढील 24 तासांत Solar storms एक भूचुंबकीय वादळ पृथ्वीवर धडकणार असून, त्यामुळे वीज जाऊ शकते तसेच जीपीएस आणि रेडिओदेखील बंद होऊ शकतात. नासा आणि राष्ट्रीय सागरी आणि वातावरणीय प्रशासनाच्या माहितीनुसार, गुरुवारी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर वादळाचा प्रभाव पडण्यापूर्वी वेगवान सौर वार्याचा प्रवाह त्याला पुढे ढकलण्यास मदत करेल.यावेळी ते तीव’ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांतील ही दुसरी घटना आहे. याचा परिणाम म्हणून उपग्रहांच्या कार्यात अडथळे येऊ शकतात. अंतराळ हवामान भौतिकशास्त्रज्ञ तमिथा स्कोव्ह यांनी ट्विटरवर इशारा दिला. नासा आणि एनओएएने दिलेल्या इशार्यानुसार, हे वादळ 14 एप्रिलला धडकणार आहे. सौर वारे मागून धक्का देत असल्याने हे वादळ तीव’ होण्याची शक्यता आहे. रेडिओ पूर्णपणे बंद होण्याची शक्यता कमी असली तरी, रात्रीच्या वेळी पृथ्वीवर रेडिओ आणि जीपीएसमध्ये अडथळे जाणवू शकतात. सौर वारे आणि पृथ्वीचे वातावरण यांच्यात ऊर्जेची पुरेशी देवाण-घेवाण झाल्यास अशाप्रकारची वादळे निर्माण होतात. अमेरिकेच्या अंतराळ हवामान विभागातर्फे या Solar storms वादळांना त्यांच्या तीव’तेनुसार जी-1 ते जी-5 असे क्रमांक दिले जातात. 14 एप्रिलला येणारे वादळ हे जी-2 दर्जाचे आहे.