मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळेमध्ये सीसीटीव्ही लावा;गुरूकुल संस्थाचालकावर तसेच आरोपी रूग्णालयातुन फरार प्रकरणात ठाणेप्रमुखाला निलंबित करा – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बीड की बिहार ?
बीडमध्ये गुंडाराज , शिक्षकी पेषाला काळीमा, पोलीसांचा धाक उरला नाही.. !
गुरूकुल इंग्लिश स्कूल बीड येथील बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल शिक्षक आरोपी रूग्णालयातुन पळुन गेल्या प्रकरणात जबाबदार ठाणेप्रमुख तसेच संबधित पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे
मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळेमध्ये सीसीटीव्ही लावा;गुरूकुल संस्थाचालकावर तसेच आरोपी रूग्णालयातुन फरार प्रकरणात ठाणेप्रमुखाला निलंबित करा:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
____________
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशावरून मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळेत सुस्थितीत व देखभाल करण्यात येत असलेले सीसीटीव्ही बसविण्यात यावेत दिरंगाई केल्याबद्दल आवश्यक कारवाई करून तसेच गुरुकुल इंग्लिश स्कुल बीड चौथी वर्गातील मुलीच्या विनयभंग प्रकरणात शालेय व्यवस्थापन तसेच संस्थाचालकावर कारवाई करण्यात यावी तसेच विनयभंग प्रकरणातील शिक्षक आरोपी रूग्णालयातुन पळुन गेल्या प्रकरणात जबाबदार ठाणेप्रमुख तसेच संबधित पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी तसेच ऑनलाइन प्रणालीमुळे सर्वशिक्षा अभियानांतर्गत परत गेलेले १३ कोटी रूपये तात्काळ मिळवुन हंगामी वसतिगृह चालकांचा थकीत निधी वितरीत करण्यात यावा आदि.मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.११ एप्रिल २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येत असून आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती शिरूर कासार तालुकाध्यक्ष अशोक कातखडे, शिक्षण हक्क आधिकार कार्यकर्ते मनोज जाधव, शिव-शाहु ऊसतोड कामगार संघटना बाळासाहेब मोरे, सामाजिक कार्यकर्ते निळकंठ वडमारे, जिल्हाध्यक्ष शेतकरी शिवसंग्राम राजेंद्र आमटे, सामाजिक कार्यकर्ते अक्षय माने, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे, सय्यद आबेद बीडकर, शेख मुबीन बीडकर, मराठवाडा उपाध्यक्ष ऑल इंडिया पॅथर सेना, नितिन सोनावणे,महेश धांडे,सचिन कोटुळे,सुभाष पाटील,सुभाष पाटील, सुहास पाटील,शिवसेना शहरप्रमुख सुनील सुरवसे,अनिकेत देशपांडे, आदि सहभागी असुन निवासी जिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले.
सविस्तर माहीतीस्तव
_____
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळेतील विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन गैरप्रकाराला आळा बसावा यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खासगी व्यावस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या सुचना शिक्षण विभागाने ७ एप्रिल २०१६ च्या परिपत्रकान्वये दिल्या असुन सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात याव्यात .तसेच आश्रमशाळा, वसतिगृहे याठिकाणी सुद्धा सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात यावी व सुस्थितीत असुन त्याची देखभाल करण्यात यावी.बीड जिल्ह्य़ातील खासगी तसेच जिल्हापरिषद व शासकीय अशा एकुण ३६८६ पैकी केवळ ४९७ शाळांमध्येच सीसीटीव्हीची सुविधा असुन ३१८९ शाळांमध्ये अद्याप सीसीटीव्हीच नाहीत, नुकत्याच पुण्यात घडलेल्या अत्याचाराच्या प्रकरणाने शाळेमध्ये आपली मुले सुरक्षित आहेत की नाहीत ही अनामिक भिती पालकांमध्ये असुन मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातुन तात्काळ सीसीटीव्ही बसविण्यात यावेत तसेच दिरंगाई करणारांवर आवश्यक कारवाई करण्यात यावी.
शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा गैरप्रकाराला आळा बसावा आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातुन सीसीटीव्ही बसविण्यात यावेत व त्याची देखभाल नियमित करण्यात यावी.
गुरूकुल इंग्लिश स्कूल शालेय व्यवस्थापन समिती तसेच संस्थाचालकावर कारवाई करा:-मनोज जाधव ,शिक्षण हक्क आधिकार कार्यकर्ते
_____
गुरूकुल इंग्लिश स्कूल बीड येथील ४ थी च्या वर्गात शिकणा-या मुलीचा विनयभंग शिक्षकाने केल्याप्रकरणात उडवाउडवीची उत्तरे जबाबदार शालेय व्यवस्थापन समिती तसेच संस्थाचालकावर कारवाई करण्यात यावी.
विनयभंग प्रकरणातील आरोपी रूग्णालयातातुन फरार प्रकरणात ठाणेप्रमुखाला निलंबित करा
____
गुरूकुल इंग्लिश स्कूल बीड येथील बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल शिक्षक आरोपी रूग्णालयातुन पळुन गेल्या प्रकरणात जबाबदार ठाणेप्रमुख तसेच संबधित पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.