बीड प्रसिद्ध कनकालेश्वर मंदीर परिसरात श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या थाटात पार पाडला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव सोहळ्या निमित्त रविवारी शहरामधुन सकाळी भव्य दुचाकी फेरी निघाली. गळ्यात भगवे गमजे व हाती भगवे ध्वज घेतलेल्या दुचाकीवरील रामभक्तांनी प्रभू रामचंद्र की जय अशा घोषणा दिल्या.शहरातील प्रमुख रस्त्यांवरुन निघालेल्या दुचाकी फेरीचा कनकालेश्वर मंदिर या ठिकाणी समारोप झाला. दुपारनंतर पुन्हा प्रभू श्रीराम चंद्र यांच्या पुतळ्याची सजविलेल्या रथातून मिरवणूक निघाली. हजारो रामभक्तांच्या गर्दीत ही शोभायात्रा शहरभरातून निघाली. रामनामाच्या घोषणांनी व गितांनी अख्खे बीड दणानून गेले. दरम्यान, शोभा यात्रा सुरु होताना कनकालेश्वर मंदीर येथे आरती झाली.
यावेळी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, भाजपचे स्वप्नील गलधर, आरएसएसचे डॉ. पी. के. कुलकर्णी, महेश धांडे, विक्रांत हजारी यांनी जन्मोत्सव सोहळ्यात आरती केली.