पत्रकार संघाचे अध्यक्ष ,जेष्ठ पत्रकार, संपादक निसार मुजावर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
पत्रकार संघाचे अध्यक्ष ,जेष्ठ पत्रकार, संपादक निसार मुजावर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
परंडा : ( सुरेश बागडे ) राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे परंडा तालूका अध्यक्ष जेष्ठ पत्रकार संपादक निसार मुजावर यांचा वाढदिवस उत्साहात पार पडला परंडा पत्रकाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
परंडा पत्रकार संघाचे अध्यक्ष मुजावर यांचा शाल ,फेटा, श्रीफळ देऊन सत्कार करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे
निसार मुजावर हे एक प्रमाणिक पत्रकार असुन ते सतत अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याच काम सातत्याने करत आहेत.
परंडा येथील त्यांची दिर्ध सेवा, प्रमाणीक सेवा बजावत अनेकांशी मैत्रीचे नाते जोडले आहे. त्यामुळे त्याचे परंडा तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रात अनेक चाहते आहेत.
परंडा शहरातील त्यांचा दांडगा संपर्क पाहता त्यांचे मित्र हितचिंतक खुप मोठ्या प्रमाणात आहेत,आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना मोठया प्रमाणात सोशल मिडीयावरून,शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.
यावेळी पत्रकार यांच्याकडून मुजावर साहेबांना लाख लाख शुभेच्छा देण्यात आल्या शुभेच्छाचा पाऊस पडला ,हसत खेळत वातावरणात, जोशात साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
यावेळी जेष्ठ पत्रकार, साहित्यीक गंगावणे, एकमतचे तालुका प्रतिनिधी प्रशांत मिश्रा, दै.सामनाचे तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे दै. संघर्षचे उमेश सोनवणे आदी सदस्य हजर होते.