ताज्या बातम्याबीड जिल्हा

बोरखेडे वस्ति-बोरखेड-गोलांग्री रस्त्याचे ३ महिन्यातच दुस-यांदा उद्घाटन;श्रेयवादाची लढाई -डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


बोरखेडे वस्ति-बोरखेड-गोलांग्री रस्त्याचे ३ महिन्यातच दुस-यांदा उद्घाटन;श्रेयवादाची लढाई :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बीड तालुक्यातील रस्त्याच्या श्रेयवादातुन एकाच कामाचे दोन विविध पक्षांच्या नेत्यांकडून उद्घाटन करण्याची परंपरा कायम राखत आज दि.६ एप्रिल बुधवार रोजी भारतीय जनता पक्षाच्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बीड तालुक्यातील बोरखेडे वस्ति-बोरखेड- गोलंग्री रस्ता सुधारणा करणे, लांबी ०/०० ते ४.३३० अंदाजे किंमत १८८.२२ लक्ष असून या रस्त्याचे भुमिपुजन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, किसान मोर्चा उपप्रदेशाध्यक्ष रमेश पोकळे, सरचिटणीस सर्जेराव तांदळे, बीड तालुकाध्यक्ष स्वप्निल गलधर, जिप सदस्य अशोक लोढा ,व ईतर भाजपा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी मोठ्याप्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते .

३ महिन्यापुर्वी आ.संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्याकडुन उद्घाटन व भुमिपुजन फलक

३ महिन्यापुर्वी दि.१९ डिसेंबर २०२१ रोजी आ.संदिप क्षीरसागर यांनी चौसाळा जिल्हापरिषद सर्कल मधिल विविध २३ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा करताना बोरखेड वस्ति-बोरखेड-गोलंग्री या रस्ताकामाचे भुमिपुजन करून तसा फलक सुद्धा लावण्यात आला असून सदरचे काम राजकमल कन्स्ट्रक्शन बीड मार्फत करण्यात येत असून ३ महिन्यापुर्वी जरी भुमिपुजन फलक लावण्यात आला असला तरी प्रत्यक्षात काम दोन-तीनदिवसापूर्वीच सुरू करण्यात आले आहे.

पब्लिक सब जानती है; पंकजाताई मुंढे यांच्या कामाचे श्रेय ईतरांनी लाटण्याचा प्रयत्न करू नये,
_____
तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंढे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सन २०१५ ते २०२१-२२ पर्यंत एकूण १९३३ किलोमीटर लांबीचे व अंदाजे किंमत ११८६ कोटी रूपये प्रशासकीय मान्यता असलेले रस्ते आणले असताना त्यांच्या कामाचे श्रेय ईतरांनी लाटणे हा कृतघ्नपणा म्हणावा लागेल, शेवटी पब्लिक सब जानती है


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *