ताज्या बातम्या

लष्करासाठी तयार अत्याधुनिक पिनाका लॉंचर पॉड


n’पॉड’ हा रॉकेट प्रक्षेपण यंत्रणेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या ‘पॉड’मधून रॉकेट डागले जाते. रॉकेटचे उद्दिष्ट आणि दिशा पॉडवर अवलंबून असते. विविध प्रकारच्या चाचण्या पार केल्यानंतरच हे ‘पॉड’ रॉकेट लोड करण्यासाठी पाठविले जाते.
n आयुध निर्माणी आता मार्गदर्शित पिनाका लाँचर पॉड विकसित करण्यासाठी काम करीत आहे. एनहान्स्ड पिनाका रॉकेटची क्षमता ४५ कि.मी., तर गाइडेड पिनाका रॉकेटची क्षमता ७५ कि.मी. आहे

भुसावळ : भुसावळच्या ऑर्डिनन्स फॅक्टरी (आयुध निर्माणी)मध्येनिर्मित अत्याधुनिक पिनाका लाँचर पॉड एमके – १ ची पोखरण येथे २९ मार्चला यशस्वी चाचणी करण्यात आली.हे पॉड तब्बल ३८ कि.मी.वरून आपला लक्ष्यभेद करणार आहे. भुसावळच्या आयुध निर्माणीचे हे मोठे यश मानले जाते. या चाचणीमुळे फॅक्टरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या सहा महिन्यांतील हे दुसरे यश आहे. डिसेंबर २०२१ मध्ये पोखरणमध्ये पिनाका रॉकेट पॉडची (डीपीआयसीएम) यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *