राज्याच्या गृहमंत्री १०० कोटींच्या खंडणी वसुलीच्या आरोपाखाली जेलमध्ये जातो. दाऊदशी संबंध असलेले नवाब मलिक हे जेलमध्ये जातात. अडीच वर्षे जेलमध्ये असलेले छगन भुजबळ हे शिवतिर्थावर मंत्रीपदाची शपथ घेतात. तुमच्या नाकावर टिचून सत्ते येऊन या सगळ्या गोष्टी करतात. आपण मात्र रांगेत लाचारासारख रांगेत उभ रहायच. राजकारणी लोक आपल्याला मेंढरासारखे वापरत आहेत. आमच्या हातात राज्य द्या, आम्ही वाटेल ते करू असाच प्रकार सुरू असल्याची टीका राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.
लोक जातीपातीच्या मुद्द्यावर एकमेकांविरोधात उभ रहावेत ही गोष्ट काही लोकांना हवी आहे. महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादीला आणि शरद पवारांना एनसीपीला ही गोष्ट हवी आहे. जेव्हा महाराष्ट्रात १९९९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाली, तेव्हापासूनच जातीपातीच राजकारण मोठ्या प्रमाणात राज्यात सुरू झाले, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने शिवतिर्थावर केला.जातीच्या निमित्ताने महाराष्ट्रात एकमेकांची भडकवायची कामे सुरू झाली.
महाराष्ट्रात एकेकाळी जातीचा अभिमान होता. पण जातीत फूट पाडायची सुरूवात ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर झाली. दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे आणि फूट पाडत राहणे याची सुरूवात राष्ट्रवादीने केली.
निवडणुकींच्या तोंडावर पैशाचा चारा टाकायचा आणि सत्ता मिळवायची असाच प्रकार सुरू झाला. आम्ही एकमेकांची डोकी फोडायला तयार झालो आहोत. आम्ही जातीच्या बाहेर जात नाही, कोणता हिंदुत्वाचा ध्वज आपण घेणार आहोत ? हिंदु म्हणून आपण कधी एक होणार आहोत असाही सवाल त्यांनी केला.
महाराष्ट्रात आज सगळीकडे बोंबाबोंब आहे. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटक नाहीत, पोलीसांची दुर्दैवी अवस्था आहे, शेतकरी आत्महत्या थांबत नाही, शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. दुसरीकडे सीबीएससीच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याची घोषणा करण्यात येते. पण महाराष्ट्रात सर्वाधिक एसएससी बोर्डाचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मराठी माणसांना पहिल्यांदा प्राधान्य मिळायला हव, फालतु लफडी इकडे आणू नका असाही सज्जड दम त्यांनी दिला.