दलित स्मशान भूमी वरचे अतिक्रमण हटवून ग्रामसेवक,सरपंचावरती दलित अत्याचार प्रतिबंधक कारवाई करावी
जातीयवादी ग्रामसेवक, सरपंचाने दलित स्मशान भूमी वरती जेसीबी च्या सहाय्याने थडगे उद्धवस्त करत अतिक्रमण करून चालू केलेले काम तात्काळ
हटवून ग्रामसेवक , सरपंचावरती दलित अत्याचार प्रतिबंधक कारवाई करावी अशी दलित समाजाची निवेदनाद्वारे एक मुखी मागणी आहे
दलित स्मशानभूमी वरील केलेले अतिक्रमण तात्काळ हटविण्यात आले नाही तर कायदेशीर मार्गाने ग्रामसेवक / सरपंच यांच्याविरुद्ध तीव्र आंदोलन केले जाईल
आंदोलनास कुठल्याही प्रकारे वेगळे वळण लागल्यास अनुचित प्रकार घडल्यास त्यास शासन जबाबदार राहील
आष्टी / बीड ( प्रतिनिधी ) : आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथे दलित वस्ती च्या बाजूस गेल्या अनेक पिढ्यांपासून दलित स्मशान भूमी आहे. या स्मशान भूमीत पूर्वजा पासून आज पर्यंत प्रेत दफन पुरले गेले असून अंत्यविधी केले जात आहेत .
परंतु मौजे धानोरा येथे सध्या कार्यरत असलेले जातीयवादी ग्रामसेवक / सरपंचांनी संगनमताने जाणून-बुजून दलित स्मशान भूमीत जेसीबीच्या सहाय्याने थडगे उद्ध्वस्त करून स्मशानभूमीत सपाटी करण करून दलित स्मशान भूमीत बांधकाम चालू केले . यासंदर्भात ग्रामसेवक / सरपंच यांना ग्रामपंचायत कार्यालय धानोरा येथे सर्व दलित बांधवांनी दलित स्मशानभूमीत केलेले अतिक्रमण थांबून चालू केलेले काम बंद करा अशी विनंती केली . ग्रामसेवक / सरपंचाने दलित समाज बांधवांची विनंती धुडकावून लावत हम करो से कायदा , याप्रमाणे काम जलद गतीने चालूच ठेवले .
सदरील बांधकाम बंद करून आमची दलित स्मशानभूमी आहे तशीच ठेवण्यात यावी , व सर्व गाव उठून स्थलांतरित होईल परंतु आमची दलित स्मशानभूमी कोठेही स्थलांतरित होणार नाही , याची नोंद घेऊन स्मशान भूमी वरील ग्रामसेवक / सरपंचाने केलेले अतिक्रमण तात्काळ हटविण्यात आली नाही तर सर्व दलित बांधव हे कायदेशीर मार्गाने मौजे धानोरा येथे सध्या कार्यरत असलेले ग्रामसेवक / सरपंच यांच्या विरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील . या आंदोलनास कुठल्याही प्रकारे गालबोट , वेगळे वळण लागल्यास व अनुचित प्रकार घडल्यास त्यास शासन जबाबदार राहील याची नोंद घेऊन मौजे धानोरा येथील दलित बांधवांना न्याय देऊन स्मशान भूमी वरती अतिक्रमण करणारे जातीयवादी ग्रामसेवक / सरपंच यांच्यावरती कायदेशीर दलित अत्याचार प्रतिबंधक कार्यवाही म्हणून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी मौजे धानोरा येथील दलित बांधवा सह ग्रामपंचायतचे आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य , माजी सरपंच उपसरपंच , लोक पाल पत्रकार सुरक्षा संघटना बीड जिल्हा अध्यक्ष गोरख मोरे सह तहसीलदार आष्टी यांना दिलेल्या निवेदनात केली असून , निवेदनाच्या प्रती मा. जिल्हाधिकारी बीड , मा. जिल्हा पोलीस अधीक्षक बीड , मा. उप जिल्हा अधिकारी पाटोदा , मा. उप विभागीय पोलीस अधीक्षक कार्यालय आष्टी , मा. पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन आंभोरा , आदींना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत .