क्राईमताज्या बातम्याबीड जिल्हाबीड शहर

बीड छत्रपती कॉलनीत १६ वर्षीय विद्यार्थीनीची आत्महत्या


बीड :बीड शहरातील छत्रपती कॉलनीत येथे राहणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सृष्टी रोहिदास काळे असं या मृत विद्यार्थीनीचं नाव होत.सृष्टी रोहिदास काळे ही विद्यार्थीनी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मात्र, तिने पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. मुलीला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहून कुटुंबियांनी आक्रोश केला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. सृष्टी काळे ही सध्या दहावीची परीक्षा देत होती. तिचे आणखी तीन पेपर शिल्लक होते.दरम्यान, सृष्टी काळे हीने आत्महत्या केली आहे की तिचा कोणी घातपात केला आहे याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. कारण कुटुंबियांशी केलेल्या प्राथमिक चौकशीतून तिने आत्महत्या करण्यासारखे काही कारण नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. सृष्टी काळेचा मृतदेह खाली उतरवण्यात आला असून, शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
दरम्यान पोलिसांनी सृष्टीचा मोबाइल देखील जप्त केला आहे. नेमक्‍या कोणत्या कारणामुळे सृष्टीने आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत. सृष्टीची हत्या आहे की आत्महत्या याचा तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत. परीक्षा सुरू असतानाच तिने अशाप्रकारे आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचंबरोबर मिळालेल्या माहितीनुसार सृष्टीने यंदा दहावीचे सगळे पेपर दिले असून विशेष म्हणजे ती मामाकडे राहत होती. आणखी तीन विषयाचे पेपर शिल्लक असतानाच तिने स्वतःचे आयुष्य संपवले आहे. नेमके कोणत्या कारणामुळे तिने आयुष्य संपवलं हे समजू शकलेले नाही. मात्र, पोलीस सर्व बाजूने तपास करत असून, लवकरच सृष्टीने आत्महत्या केली आहे का तिचा कोणी घातपात केला आहे. हे समोर येईल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *