मेंढपाळ व माता भगिनींच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
बीड : आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर साप्ताहिक परिवर्तन अभिवादन सभा या सभेचे आयोजक माननीय प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य हे अनेक दिवसापासून करत आहेत आजच्या या अभिवादन सभेचा विसावा रविवार असून या अभिवादन सभेसाठी बीड जिल्ह्यातील मेंढपाळ बांधव व माता-भगिनी यांच्या हस्ते आज एक समाजामध्ये आनंदाचे वातावरण समाजामध्ये जागृतीकरण वाढवण्यासाठी भटकंती करणारा मेंढपाळ या मेंढपाळांच्या हस्ते आज बीड येथे मोठ्या उपस्थिती मध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, राजे यशवंतराव होळकर, राजे मल्हारराव होळकर यांना मेंढपाळांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे यासाठी अनेक दिवसापासून प्रकाश भैय्या सोनसळे यांनी पुढे येऊन हा उपक्रम सुरू केला आहे
आज बीड येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर राजे मल्हारराव होळकर, राजे यशवंतराव होळकर, यांना अभिवादन करण्यासाठी मेंढपाळ यांना यांना निमंत्रित करण्यात आले होते
आम्हाला बोलावलं त्याबद्दल प्रकाश भैय्या सोनसळे यांचे आभारी आहोत आज नेतेमंडळी अधिकारी कर्मचारी सर्व क्षेत्रातील समाज बांधव यांच्या हस्ते न करता एक मेंढपाळाच्या हस्ते हा अभिवादनाचा कार्यक्रम घेतला आज खरोखर एक मेंढपाळ बांधवांच्या व माता भगिनींच्या हस्ते अभिवादन करून घेतले हा क्षण ही वेळ आम्ही कधीच विसरू शकत नाहीत आज प्रकाश भैय्या यांच्यामुळे नक्कीच या समाजामध्ये जागृती चे संदेश हा वाडी-वस्तीवर गेल्याशिवाय राहणार नाही कारण आज मेंढपाळ हा रानावनात राहतो जर हा रानावनातला मेंढपाळ येऊन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर अभिवादन करत असेल नक्कीच परिवर्तनाची लाट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असे मेंढपाळ बांधव व माता भगिनींनी या वेळी सांगितले.
यावेळी महादेव रुपनर, विक्रम सोनसळे मेंढपाळ, राजू ताई सोनसळे मेंढपाळ, आकाश नरोटे मेंढपाळ, प्रकाश नरोटे मेंढपाळ, लिंबाजी महानवर ,भारत गायके, नारायण भोंडवे,प्रकाश रुपनर, चंद्रशेखर तागड, सुधाकर वैद्य, अंकुश गवळी, रमेश शिंदे, शीतल मतकर, सोनसळे दिदी,मतकर भैय्या, लक्ष्मण खरात, अश्वलिंग बरे ,वैध भैय्या आदी समाज बांधव उपस्थित होते