बीड गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर खिचडी करून गांधीगिरि आंदोलन
गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर खिचडी करून गांधीगिरि आंदोलन :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बीड : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल सह मोठ्याप्रमाणात एलपीजी गॅस सिलेंडर किंमत वाढवुन महागाई वाढवण्याच्या धोरणाच्या तसेच शेड्यूल ड्रग्स श्रेणीतील ८०० औषधांच्या १० टक्क्यांनी किंमती वाढविण्यास दिलेली मंजुरीच्या निषेधार्थ व वाढीव किंमती तात्काळ कमी करण्यात याव्यात यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२८ मार्च २०२२ सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव घेऊन चुलीवर खिचडी बनवुन प्रतिकात्मक गांधीगिरी आंदोलन करत केंद्र सरकारच्या दर वाढीच्या धोरणाच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात अड.करूणा टाकसाळ, रामनाथ खोड, शेख युनुस च-हाटकर, हमीदखान पठाण,अशोक कातखडे, नितिन सोनावणे, डाॅ.संजय तांदळे, मोहम्मद मोईज्जोदीन, शेख मुबीन, सय्यद आबेद, अंकुश दहे, आदि सहभागी आहेत.
सविस्तर
केंद्र सरकारने दि.२३ मार्च २०२२ रोजी पासुन पेट्रोल-डिझेल सह एलपीजी गॅस प्रति सिलेंडर ५० रू किंमती वाढवल्यामुळे महागाईत भर पडली असून सर्व सामान्यांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारावर याचा परीणाम होत असून सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले असून केंद्र शासनाच्या दरवाढीच्या धोरणाच्या निषेधार्थ व वाढीव किंमती कमी करण्यात याव्यात
अशी मागणी डाॅ.गणेश ढवळे, शेख युनुस,मोहम्मद मोईज्जोदीन, शेख मुबीन, डाॅ.संजय तांदळे, नितिन सोनावणे,आदिंनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री यांना केली आहे.
औषधांचे वाढीव दर तात्काळ कमी करावेत:-डाॅ.गणेश ढवळे
दि.१ एप्रिल २०२२ पासुन सामान्य आजारापासुन ते गंभीर स्थितीतील रूग्णांवरील उपचारांसाठी वापरण्यात येणारी ८०० औषधे महागणार असून त्यात तापेच्या पैरासिटामोल पासुन कोरोना,हद्यरोग, उच्च रक्तदाब, त्वचारोग, त्वचारोग, अनिमिया, कर्करोग, वेदनाशामक आदि वरील उपचारांसाठी “शेड्यूल ड्रग्स ” श्रेणीतील औषधांच्या किंमती १० टक्क्यांनी वाढविण्यास केंद्र सरकारने दिलेली मंजुरी तात्काळ रद्द करण्यात यावी दैनंदिन वापरातील जीवनावश्यक औषधांच्या किंमती वाढल्यामुळे जगणंच महाग होणार आहे त्यामुळेच वरील वाढीव दर घटविण्यात यावेत.