मनसेने मोकाट जनावरांच्या अंदोलना दिवशी मुख्यअधिकारी यांना चारा देऊन केली गांधीगीरी
मनसेने मोकाट जनावरांच्या अंदोलना दिवशी मुख्यअधिकारी यांना चारा देऊन केली गांधीगीरी
————————————————
तीन दिवसात जनावरांचा बंदोबस्त करू-मुख्यअधिकारी बळवंत मोरे
————————————————
आष्टी(प्रतिनिधी)-शहरात फिरास्ते मोकाट जनावरांचा नगर पंचायतने बंदोबस्त करावा म्हणून,आज दि.25 रोजी मोकाट जनावरे नगर पंचायत कार्यालयात सोडण्यात आले.यावेळी मनसे ने मोकाट जनावरे सोडून देऊन,नगर पंचायतचे मुख्यअधिकारी बळवंत मोरे यांचा गुरांचा चारा देऊन गांधीगिरी केली.येत्या तीन दिवसांत शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणार असल्याचे मुख्यअधिकारी बळवंत मोरे यांनी सांगीतले.
आष्टी शहरातील मोकाट जनावरांनी आष्टीकर हैराण झाले असुन,या जनावरांचा बंदोबस्त करा नाहीतर हे सर्व जनावरे नगर पंचायत कार्यालयात सोडणार असल्याचे निवेदन दि.15 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी लेखी निवेदन तहसिलदार,पोलिस निरीक्षक व नगर पंचायत मुख्यअधिकारी यांना दिले होते.त्यानुसार आज दि.25 रोजी आष्टी शहरातील जवळपास पंधरा ते वीस मोकाट जनावरे मनसे कार्यकर्त्यांनी धरून नगर पंचायतमध्ये आणले परंतु नगर पंचायतमध्ये कोंडवाडा नाही.आपण आम्हाला तीन चार दिवसाची मुदत द्या आम्ही या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करू असे आश्वासन मुख्यअधिकारी यांनी दिल्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी गांधीगीरी करत जनावरांना आणलेला चारा मुख्यधिकारी यांना भेट देऊन जर कारवाई केली नाही तर एकही कर्मचारी पदाधिकारी नगर पंचायतमध्ये येऊ न देता नगर पंचायतला कुलूप लावण्याचा इशारा दिला आहे.