खोट्या एमपीडीय मधुन प्रा शिवराज बांगरांची सुटका करा म्हणुन बीड जिल्हा अधीकारी कार्यालया समोर 28 मार्च 2022 रोजी सर्वपक्षीय निदर्शने
बीड : बहुजन समाजाचे नेते प्रा़ शिवराज बांगर यांना खोट्या एमपीडीय मध्ये तब्बल नव्वद दिवसा पासुन अटक केले आहे, अनेक वेळा सर्वच पक्ष संघटनांनी बीड जिल्हा अधीकारी व बीड जिल्ह्यातील सर्वच तहसिलदार यांना निवेदन दिले आहे, निवेदनात वार वार सांगीतले आहे की प्रा शिवराज बांगर यांच्या वरील एमपीडीय कार्यवाही राजकीय सुडबुद्धीने केली आहे, त्यांच्या वर कुठे ही गंभीर गुन्हे नाहीत, सामाजिक कार्य करत आसतांनी किरकोळ गुन्हे त्यांच्या वर दाखल आहेत, परंतु एका ही गुन्ह्यात त्यांना गुन्हेगार म्हणून निकाल दिला नाही, हे जिल्हा अधीकारी यांना निवेदनाच्या माध्यमातुन सांगीतले आहे, परंतु बीड जिल्हा अधीकारी यांच्या कडुन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे आज परत एकदा बीड जिल्हा अधीकारी यांना सर्व पक्षांच्या वतीने निवेदन दिले त्या निवेदनात भाजप किसान मोर्चाचे बीड तालुका अध्यक्ष बाळासाहेब आत्माराम मोरे व सामाजीक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी प्रा शिवराज बांगर यांची सुटका करा म्हणुन बीड जिल्हा अधीकारी कार्यालया समोर दिनांक 28/03/2022 रोजी लोकशाही मार्गाने सर्व पक्षीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती दिली आहे, निवेदनात म्हटले आहे की बहुजन समाजाचे नेते प्रा शिवराज बांगर हे विस वर्षा पासुन बीड जिल्ह्यात सामाजीक व राजकीय जीवनात सक्रीय आहेत, ते दलित, पिडीत , उसतोड कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव संविधानीक लोकशाही मार्गाने लढा देत आहेत, परंतु राजकीय सुडबुद्धीने त्यांच्या वर एमपीडीय सारखी भयान कार्यवाही करून त्यांना 90 दिवसा पासुन औरंगाबाद हार्सुल जेल मध्ये स्थानबद्ध केले आहे, 90 दिवस उलटुन गेले तरी देखील त्यांची सुटका झाली नाही, त्यामुळे आम्ही सर्व पक्षांच्या व सामाजीक संघटनांच्या वतीने 28 मार्च 2022 रोजी बीड जिल्हा अधीकारी कार्यालया समोर लोकशाही मार्गाने धरने आदोलंन करणार आहोत, अशी माहिती निवेदनात दिली आहे,एक गरीब कुंटुबांतील कार्यकर्ता संघर्षातुन उद्योजक होतो, संस्था चालक होतो, अनेक नव्या पिढ्या घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आणी अशा प्रामाणिक कार्यकरत्यावर अशी कार्यवाही होणे ही शोकांतिका आहे, त्यामुळे प्रा शिवराज बांगर यांच्या वरील एमपीडीए कारवाई रद्द करावी म्हणुन 28 मार्च 2022 रोजी जिल्हा अधीकारी कार्यालया समोर सर्व पक्षांच्या संघटनांच्या वतीने धरने आंदोलन करण्याचे ठरवले आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांना सामाजीक संघटनांना देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आव्हान केले आहे , बीड जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्ता वाचला पाहिजे अशी ज्यांची प्रमाणीक इच्छा आहे त्यांनी धरने आदोंलनात सहभागी व्हावे अशे देखील आव्हान करण्यात आले आहे….