ताज्या बातम्या

पुतीन यांच्या संपत्तीचा आकडा 700 गाडया, 58 विमान,19 घर, कोट्यावधींची घडयाळं


रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने संपूर्ण जगाला धक्का बसला असून दुसऱ्या महायुद्धातनंतर पहिल्यांच जग अशा युद्धाला सामोरं जात आहे. यासोबतच संपूर्ण जगाचं लक्ष आंतरराष्ट्रीय राजकारणातील सर्वाधिक प्रभावशाली असणाऱ्या पुतीन यांचं नाव चर्चेत आलं आहे.

केजीबी अधिकारी राहिलेल्या पुतीन यांच्याबद्दल नेहमीच अनेकांना उत्सुकता राहिली आहे. यानिमित्ताने त्यांच्या लाइफस्टाइलबद्दल जाणून घेऊयात.

फॉच्युननुसार, पुतीन वर्षाला १ लाख ४० हजार डॉलर्स कमावतात.

या अहवालानुसार, सार्वजनिकरित्या घोषित केलेल्या मालमत्तेत ८०० चौरस फुटांचे अपार्टमेंट, एक ट्रेलर आणि तीन कार आहेत.

पण पुतीन हे नेहमीच जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असल्याचं मानलं जात आहे.

गुंतवणूक आणि मालमत्ता व्यवस्थापन कंपनी हर्मिटेज कॅपिटल मॅनेजमेंटने २०१७ मध्ये केलेल्या दाव्यानुसार, पुतिन यांची वैयक्तिक संपत्ती २०० बिलियन डॉलर आहे. कंपनीचे सीईओ बिल ब्राउडर यांनी यूएस सिनेटच्या न्यायिक समितीसमोर हा दावा केला होता.

ब्राउडर हे १९९० च्या दशकात रशियामध्ये मोठे गुंतवणूकदार असल्याने त्यांचा दावा गांभीर्याने घेण्यात आला होता.

पुतीन यांच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या संपत्तीबद्दल नेहमीच अनेक दावे केले जात असतात.

फॉर्च्यूनच्या म्हणण्यानुसार, पुतिन Patek Philippe चे ६० हजार डॉलर्सचं Perpetual Calendar आणि A Lange & Sohne Toubograph चं ५ लाखांची महागडी घड्याळं वापरतात.

दोन वर्षांपूर्वी एबीसी न्यूजने एका व्हिडीओच्या आधारे सादर केलेल्या रिपोर्टमध्ये पुतीन यांनी आपल्या पगाराच्या सहा पट महागडं ७ लाख डॉलर्सचं घड्याळ घातलं असल्याचा दावा केला होता.

पुतीन हे समुद्राच्या कडेला उंच कड्यावर असणाऱ्या १९ हजार चौरस फुटांच्या हवेलीचे मालक असल्याचंही बोललं जातं. या हवेलीत संगमरवरी स्विमिंग पूल, स्पा, थिएटर, वेगास शैलीतील कॅसिनो आणि नाईट क्लब असल्याचं सांगितलं जातं.

रशियामधील विरोधी नेत्यांनी या हवेलीची फोटो प्रसिद्ध केले होते, ज्याला त्यांनी “Putin’s Country Cottage” असं म्हणतात. फोटोंमध्ये ५० हजार डॉलर्सचं बार टेबल, ८५० डॉलर्सचं डायनिंग रूम फर्निचर, ५४ हजार डॉलर्सचा बार टेबल, ८५० डॉलर्सचे इटालियन टॉयलेट ब्रशेस आणि १२५० डॉलर्सचे टॉयलेट पेपर होल्डरसह सजवलेले बाथरूम दाखवण्याचा दावा केला होता.

परंतु बीबीसीने , यावर्षी जानेवारीमध्ये आर्काडी रोटेनबर्ग यांनी या हवेलीचे मालक असल्याचं म्हटलं होतं.

पुतीन यांच्याकडे हवेलीसोबतच १९ घरं, ७०० गाड्या, ५८ विमानं आणि हेलिकॉप्टर्स असल्याचा दावा आहे. यामध्ये असणाऱ्या “The Flying Kremlin” विमानाचा खर्च ७१६ मिलियन डॉलर्स असून त्यात सोन्यापासून तयार केलेलं टॉयलेट असल्याचं सांगितलं जातं.

द गार्डियनने इटलीमधील १४० मीटर लांब, सहा मजली सुपर यॉटचा फोटो छापला होता, जो पुतीन यांच्या मालकीचा असल्याचं सांगितलं जातं. याची किंमत ७०० मिलियन डॉलर्स आहे.

इटालियन संसदेत मंगळवारी झालेल्या चर्चेदरम्यान युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ही बोट जप्त करण्याची मागणी केली.

इतकी संपत्ती असतानाही पाश्चिमात्य देशांनी पुतीन यांच्यावर कोणतेही निर्बंध लावलेले नाहीत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *