पाकिस्तानात जोरदार राजकीय उलथापालथ होत आहे. पाकिस्तान संसदेतील विरोधी पक्षाला अपेक्षा आहे की, उद्या संसदेचे अध्यक्ष आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अविश्वासाचा ठराव मांडला जाईलजर हा ठराव स्वीकारण्यास विरोध केला किंवा उशीर केला तर सचिवालयात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही विरोधी पक्षाने दिला आहे.
पाकिस्तानच्या (Pakistan) सियालकोटमध्ये (Sialkot) काही मोठे हल्ले (Blast) झाले आहेत. यामुळे लष्करी तळावर (Army Base) भीषण आग लागली आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.माहितीनुसार, पाकिस्तानमधील लष्करी तळावर निशाणा साधला होता. पण हे हल्ले कसे झाले याबाबत अद्यापही कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही. दरम्यान पाकिस्तानमध्ये सध्या इमरान खान सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी विरोधी पक्षांकडून सातत्याने केली जात आहे. अशात सियालकोटमध्ये हल्ले झाल्याने इमरान खान सरकारला आणखीन अडचणीत आणले जाऊ शकते.द डेली मिलापचे पत्रकार ऋषि सूरी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘उत्तर पाकिस्तानातील सियालकोट लष्करी तळावर काही हल्ले झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार हा एक दारुगोळा पुरवठा करणारा भाग आहे. त्यामुळे हल्ल्यानंतर भीषण आग लष्करी तळावर लागली आहे. आतापर्यंत हल्ल्यामागचे नेमके कारण काय आहे? हे स्पष्ट झालेले नाही.