ऑप्टिकल इल्युजन तुम्हाला माहितीच असेल, हे आपल्या डोळ्यांना आणि डोक्याला असा काही चकमा देतो की, आपल्या त्यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. आता ही एक असाच फोटो समोर आला आहे.जो तुम्हाला चक्रावेल. हा एका मांजरीचा फोटो आहे. हे चित्र राखाडी, काळा आणि पांढऱ्यारंगापासून बनवलेला आहे. जो तुम्हाला भ्रमात टाकेल. असाच एक ऑप्टिकल भ्रम सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
मांजर आणि शिडीचे हे चित्र पाहून तुम्हाला मांजर वर चढताना किंवा उतरताना दिसत आहे, आता हे तुमच्या मन:स्थितीवर अवलंबून आहे की, तुम्हाला मांजर नक्की काय करताना दिसत आहे. पाहा तुम्हाला या चित्रात ती काय करताना दिसत आहे.
हे मनोरंजक पहिले द माइंड्स जर्नलने शेअर केले आहे, ज्यामध्ये एक मांजर पायऱ्या चढत आहे. आता हा फोटो पाहून तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही म्हणू शकता.
आता या फोटोवरुन माणसाच्या आयुष्याचा आणि त्याचा वागण्याचा देखील संबंध आहे. त्यामुळे मांजर तुम्हाला वर जाताना दिसतेय? की खाली येताना? याचा नीट विचार करा.
फेसबुकवर या मुद्द्यावरून लोकांमध्ये बराच वाद सुरु आहे. तुम्ही पण नीट बघा मांजर कुठे जात आहे?
आता परीक्षेचा निकाल जाणून घ्या
जर तुम्हाला एखादी मांजर पायऱ्यांच्या वर चढताना दिसत असेल, तर तुम्ही जीवनाकडे आशावादी वृत्तीने पाहाता. तुम्हाला कुठेही प्रगतीची संधी मिळू शकते. माइंड जर्नलमधील लेखानुसार, तुमचे मन जीवनात पुढे जाण्यासाठी बनवले जाते. आपण एक चांगले व्यक्ती आहात.
दुसरीकडे, जर मांजर तुमच्यावर खाली जात आहे असे वाटत असेल, तर तुम्ही निराशावादी दृष्टीकोन असलेली व्यक्ती आहात. हे कदाचित तुमच्या जीवनातील अनुभवांमुळे असेल, परंतु तुम्हाला जीवनाची नकारात्मक बाजू दिसते. तुम्ही कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाही आणि कोणीही तुम्हाला पटकन फसवू शकत नाही.