भारतात लवकरच कोरोनाची चौथी लाट येईल, असा अंदाज वर्तवला आहे.
आयआयटी कानपुरमधील शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, भारतात 22 जूनपर्यंत कोरोनाची लाट येईल. शास्त्रज्ञांनी याबाबत धक्कादायक इशाराच दिला आहे.
आयआयटी कानपूरच्या तज्ज्ञांनी कोरोनाबाबत आतापर्यंत जितके अंदाज वर्तवले आहेत त्यातील बहुतांश आकडेवारी खरी ठरल्याचं पहायला मिळालं आहे.
ऑगस्ट 15 ते 31 दरम्यान सर्वाधीक रूग्णवाढ असेल आणि जवळपास चार महिने ही लाट राहिल. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रूग्णांवर किती परिणाम होईल हे लसीकरण आणि बुस्टर डोसवर अवलंबून असेल असंही तज्ज्ञ म्हटलंय.
दरम्यान, कोरोनाला हलक्यात घेऊ नका कारण कोरोना अद्याप पूर्णपणे नष्ट झालेला नाही, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
कोरोना महासाथीच्या रोगानं थैमान घातलं आहे. त्यामुळे चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.