ताज्या बातम्याबीड जिल्हा

सह्याद्री-देवराई वनविभागात महिनाभरात दुस-यांदा आग; वनविभागीय आधिका-यांना घटनेचे गांभीर्य नाही ,प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय नागपुर यांना तक्रार


सह्याद्री-देवराई वनविभागात महिनाभरात दुस-यांदा आग; वनविभागीय आधिका-यांना घटनेचे गांभीर्य नाही ,प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय नागपुर यांना तक्रार

बीड : बीड जिल्ह्य़ातील वनविभागातील आधिका-यांना शासन कोट्यावधी रूपये वनविभागातील विविध कामावर खर्च करत असताना त्यात कागदोपत्रीच बोगस कामे दाखवुन मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करत असतानाच वनविभागातील ऊरल्यासुरल्या झाडांचे संरक्षण, संवर्धन करण्याची जबाबदारी पार पाडता येत नसुन सह्याद्री-देवराई परीसरात महिनाभरातच दुस-यांदा आग लागल्यामुळे कर्तव्यावर कसुर केल्याबद्दल वनविभागातील आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत विभागीय आयुक्त, प्रधान सचिव महसुल व वनविभाग, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख)कार्यालय नागपुर यांना केली आहे.

महिनाभरातच सह्याद्री-देवराई वनविभागात दुस-यांदा आग
____
सह्याद्री-देवराई परीसरात दि.१३ फेब्रुवारी रोजी आगीत झाडांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले अहतानाच महिना पुर्ण होण्याच्या आतच दि.९ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता वनपरिक्षेत्र, वनमंडळ बीड, नियतक्षेत्र पालवण, फाॅ.सव्हे नंबर ३७९ गावाचे नाव गौळवाडी (पा )कं.नं.३७८ रोपवनक्षेत्र २५ हेक्टर भाग-१,रोपनवर्षे २०१८-१९(एमपीडब्लु),२०१९-२० (एफवायओ) परीसरात आग लागली असुन अंदाजे १० एकरक्षेत्रातील ४०००-५००० झाडांचे जळुन नुकसान झाल्याचे बोलले जाते..

आग लागल्याची कल्पना देऊन सुद्धा वनविभागातील आधिकारी आलेच नाहीत,कामच करत नाहीत :-सुभाष मस्के
____
आग लागली, ग्रामस्थांनी आग विझवली परंतु वनविभागातील आधिका-यांना फोनवरून कल्पना देऊन सुद्धा कोणीही आले नाही, कर्मचारी आधिकारी इकडे फिरकत नसल्याची तक्रार ग्रमस्थांनी केली असून वनविभागातील कर्मचा-यांना याचे गांभीर्य नसल्याची संतप्त प्रतिक्रीया दिली आहे आग विझवताना पंडीत साबळे, राहुल साबळे, किशोर काळे, वैभव काळे, वसंत काळे, बंडु शेंडगे, राजेंद्र गाडे, लक्ष्मण जाधव, मनोज भडंगळे, सतिश कळसाने, रामभाऊ पवार, सागर मस्के,भागवत मस्के, सुभाष मस्के आदि हजर होते.

प्रधान सचिव महसुल व वनविभाग, मुख्य वनसंरक्षक कार्यालय नागपुर, विभागीय आयुक्तांना तक्रार
____
वनविभागातील आधिका-यांवर जिल्हाप्रशासनाचा अंकुश नसुन जिल्हाधिका-यांनी १० वेळा वनविभागातील गैरव्यवहार प्रकरणात तक्रार, आंदोलनानंतर चौकशी अहवाल मागितल्यानंतर एकदाही अहवाल दिला नसल्याचे माहीती आधिकारात उघड झाले असून कागदोपत्रीच बोगस कामे दाखवुन वनविभागातील आधिका-यांनी संगनमतानेच कोरोना कालावधीत १० कोटी ८४ लाख रूपयांचा अपहार केला असून तक्रारीनंतर चौकशी व कारवाईच्या भितीने बेकायदेशीररीत्या पोकलेन, जेसीबी यंत्राच्या सहाय्याने राखीव वनविभागात कामे करणे तसेच वारंवार वनविभागात आगीच्या घटना संशयास्पद असुन संबधित प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री, वनमंत्री, प्रधान सचिव महसुल व वनविभाग, मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख)कार्यालय नागपुर,विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना केली आहे.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं.८१८०९२७५७२


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *