आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांचा प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांच्या हस्ते सत्कार
आष्टी : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाच्या वतीने संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे, सचिव अतुल सेठ मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार बी.के. मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांच्या हस्ते आष्टी तहसील मधील विविध पदांवर असलेल्या महिला कर्मचारी व्ही.एन.जाधव,मनीषा बांगर,मीरा नजन,निर्मला धोंडे,व्ही.एस.ईगे, संगीता चितळे,कल्पना मोकन,कविता साळुंके,सुषमा खाडे,अश्विनी सोनवणे यांचा पुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,अविनाश कंदले,प्रा.जे.एम.पठाण, प्रा.ज्ञानेश्वर नवले,प्रा.दत्तात्रय मुंढे,डॉ.अभय शिंदे,कवी प्रा.सय्यद अलाउद्दीन,प्रा.अशोक भोगाडे,प्रा.महेंद्र वैरागे,प्रा.बबन उकले, ग्रंथालय सहाय्यक सचिन निकाळजे, प्रा.किरण निकाळजे आदी उपस्थित होते.