उपोषणार्थींना निवारा शेड उपलब्ध करून द्या;सामाजिक व राजकीय संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
उपोषणार्थींना निवारा शेड उपलब्ध करून द्या;सामाजिक व राजकीय संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
बीड (प्रतिनिधी)ः- बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना व राजकीय संघटनांचे कार्यकर्ते यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणस्थळी निवारा शेड उभारावे पिण्याचे शुद्ध पाणी, सुलभ शौचालय तसेच जिल्ह्यातील तहसिल, पंचायत समिती कार्यालयासमोर मुलभुत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आदि. मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दि. ७ मार्च २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत असून जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, विभागीय आयुक्त
सुनिल केंद्रेकर यांना निवेदन देण्यात आले,या आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे , मुक्तपत्रकार तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एस एम युसुफभाई, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष शिरूर कासार अशोक कातखडे ,मोहम्मद मोईज्जोदीन, शेख मुबीन सय्यद आबेद , शिक्षणहक्क कार्यकर्ते मनोज जाधव, सामाजिक कार्यकर्ते शार्दुल देशपांडे, वृक्षप्रेमी अभिमान खरसाडे, विश्वकल्याण महिला सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष किस्किंदा पांचाळ, जिल्हा सरचिटणिस भाजपा महिला आघाडी अड.संगीता धसे, भाजपा जिल्हा सरचिटणिस सर्जेराव तात्या तांदळे,आप जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे, सचिव रामधन जमाले, मिडीया प्रमुख रामभाऊ शेरकर, कोषाध्यक्ष कैलासचंद पालीवाल,सुदाम कोळेकर आदि उपस्थित होते, निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना देण्यात आले.
सविस्तर माहीतीस्तव:-
__________
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणस्थळी पक्ष, सामाजिक संघटना, सामान्य नागरीक सातत्याने आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषणास बसत असतात. पावसाळा, हिवाळा व उन्हाळ्यात त्यांची गैरसोय होत असून या बाबत विविध सामाजिक संघटनेने व कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी निवार्यासाठी वेळोवेळी आंदोलन करून शासनाला निवेदन दिलेले आहे. निवारा उभारण्यासाठी नुकतेच रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनचे अध्यक्ष राजकुमार बंब यांनी जिल्हाधिकारी बीड यांना पत्र्याचे शेड बनविण्यासाठी परवानी देण्यात यावी असे लेखी पत्र दिलेले आहे. परंतु अद्याप पर्यंत प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही. उलटपक्षी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणस्थळी असलेले ५० वर्षापूर्वीचे कडूनिंबाचे झाड प्रशासनाकडून नुकतेच तोडण्यात आले असून आंदोलनकर्त्यांची सावली शासनाने हिरावून घेतली आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना सध्या उन्हाचा त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाने उपोषणस्थळी तात्काळ निवारा उभारावा अथवा रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनला निवारा शेडसाठी परवानगी द्यावी. तसेच पिण्याचे शुद्ध पाणी, सुलभ शौचालय आदि.प्रमुख मागण्या आहेत.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं.८१८०९२७५७२