ताज्या बातम्यापरळीबीड जिल्हा

परळीत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा- संजय मुंडे


 

परळी : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या शिबिराचा शहरातील गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाचे तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे यांनी केले आहे.

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भव्य मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या संकल्पनेतून शिबीर होत आहे. ६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत राणी लक्ष्मीबाई टॉवर जवळील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात हे शिबीर होणार आहे. या शिबिरात स्त्री रोग, बालरोग, र्‍हदय रोग, त्वचा रोग, नेत्र रोग, कान – नाक – घसा, अस्थी रोग, जनरल सर्जरी, दमा व छातीचे विकार, दंत रोग, मुत्रविकार, अस्थी रोग आदींची तपासणी करून औषधोपचार केले जाणार आहेत. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होऊन रूग्णांची तपासणी, उपचार करणार आहेत. शिबीरामध्ये तपासणी झाल्यानंतर रूग्णांचा आजार व गरजेनुसार डाॅक्टरांच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचा गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाचे तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे यांनी केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *