विद्यार्थी ,नर्सिंग स्टाफ यांना सोबत घेऊन आंदोलन करणार भक्तराम फड
परळी : महाराष्ट्र नर्सिंग परिचर्या परिषदेचा भोंगळ कारभार विद्यार्थी ,नर्सिंग स्टाफ यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र नर्सिंग परिचर्या परिषदेचा भोंगळ कारभार सुधाराव विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असा इशारा भक्तराम फड यांनी दिली आहे.
महाराष्ट्र परिचर्या परिषद( M N C ) मुंबई महाराष्ट्रातील सर्व प्राचार्य, शिक्षक, परिचारिका ,ब्रदर्स यांच्या रजिस्ट्रेशन ची शेवटची तारीख ही 31/03/2022 आहे तरी सर्वांना आपले रजिस्ट्रेशन वेळेवर व्हावे असे वाटते पण रिनीवल करण्यासाठी येणाऱ्या अडिअडचणी साठी विद्यार्थी रोज सकाळी 9 ते 6.पर्यंत फोन लावत आहेत तरी सुद्धा दिवसभर फोन साईटला ठेवून बिझी दाखवत आहे विद्यार्थ्यांना ईमेलचा सुध्दा आठ आठ दिवस रिपाल्य दिला जात नाही महाराष्ट्र नर्सिंग काँन्सिल मध्ये चालय तरी काय रिनीवल साठी येणाऱ्या व अडीअडचणी साठी कायमस्वरूपी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करावी आणि स्वतःचा मनमानी कारभार बंद करावा व महाराष्ट्रातील सर्व प्राचार्य ,शिक्षक, विद्यार्थी, नर्सेस ,ब्रदर्स यांना न्याय मिळावा अन्यथा या अधिवेशनमध्ये आझाद मैदानात उपोषण करण्यात येईल याची दखल महाराष्ट्र परिचर्या परिषदेने घ्यावी असे आवाहन भक्तराम फड यांनी केले आहे..